कुठे गेले युनिक नंबर्स?; इलेक्टोरल बाँड्सवरून SC ने पुन्हा SBI ला झापले; दिला सोमवारपर्यंतचा वेळ

नवी दिल्ली : सर्वोच्च न्यायालयाने एसबीआयला बाँड क्रमांक जाहीर करण्याचे आदेश दिले आहेत. तसेच सर्वोच्च न्यायालयाने एसबीआयच्या अध्यक्षांना नोटीस बजावली असून सोमवारपर्यंत (दि.18) यासंबंधीची आकडेवारी जाहीर करण्याचे निर्देश दिले आहेत. तसेच बाँड खरेदीची तारीख, बाँड नंबर व्यतिरिक्त अल्फा न्यूमेरिक नंबर आणि रिडेम्प्शनची तारीख उघड करण्याचे आदेशही सुप्रीम कोर्टाने SBI ला दिले आहेत. (SBI Has To […]

Letsupp Image   2024 03 13T142735.346

Letsupp Image 2024 03 13T142735.346

नवी दिल्ली : सर्वोच्च न्यायालयाने एसबीआयला बाँड क्रमांक जाहीर करण्याचे आदेश दिले आहेत. तसेच सर्वोच्च न्यायालयाने एसबीआयच्या अध्यक्षांना नोटीस बजावली असून सोमवारपर्यंत (दि.18) यासंबंधीची आकडेवारी जाहीर करण्याचे निर्देश दिले आहेत. तसेच बाँड खरेदीची तारीख, बाँड नंबर व्यतिरिक्त अल्फा न्यूमेरिक नंबर आणि रिडेम्प्शनची तारीख उघड करण्याचे आदेशही सुप्रीम कोर्टाने SBI ला दिले आहेत. (SBI Has To Disclose Electoral Bond Numbers Says Supreme Court) 

तसेच सुप्रीम कोर्टाने एससी रजिस्ट्रारला सर्वोच्च न्यायालयात जमा केलेला डेटा उद्या संध्याकाळी 5 वाजेपर्यंत निवडणूक आयोगाकडे सोपवण्याचे आदेश दिले आहेत. कोर्टाने ईसीआयला कोर्टाकडे उपलब्ध असलेला डेटा रजिस्ट्रीमधून मिळाल्यानंतर पोर्टलवर प्रदर्शित करण्याचे आदेश दिले आहेत.

कधीकाळी मजूर असणारा ‘लॉटरी किंग’ Electoral Bond खरेदीत अव्वल…नेमका आहे तरी कोण?

भाजपाला छप्परफाड देणगी

सर्वोच्च न्यायालयाने निवडणूक रोख्यांविषयी (Electoral Bond Data) आदेश दिल्यानंतर आता भारतीय स्टेट बॅंक ऑफ इंडियाकडून निवडणूक आयोगाकडे माहिती देण्यात आली आहे. या माहितीनूसार भारतीय जनता पार्टीच्या (BJP) सर्वाधिक देणग्या घेणारा पक्ष असल्याचे समोर आले आहे. ज्यात 12 एप्रिल 2019 ते 11 जानेवारी 2024 पर्यंत पक्षाला सर्वाधिक 6,060 कोटी रुपये मिळाले आहेत.

निवडणूक रोख्यांच्या माध्यमातून भाजपला कोट्यावधी मिळाले असल्याचंही समोर आलं आहे. निवडणूक रोख्यांमध्ये देशात भाजपच पहिल्या नंबरवर असल्याचं समोर आलं आहे. तर दुसऱ्या क्रमांकावर तृणमूल काँग्रेसच्या (Congress) नावावर 1 हजार 609 नोंदी असल्याचं समोर आलं आहे. यामध्ये देशातील अनेक पक्षांच्या नोंदी आहेत. राज्यातील राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना पक्षाच्या नावानेही नोंदी आढळून आल्या आहेत.

Electoral Bonds : खटले जिंकून देणाऱ्या साळवेंचा युक्तिवाद कुचकामी; सुप्रीम कोर्टाने उडवल्या चिंधड्या

निवडणूक आयोगाने संकेतस्थळावर प्रसिद्ध केलेल्या माहितीनुसार 1 एप्रिल 2019 ते 11 एप्रिल 2019 दरम्यान एसबीआयकडून 3,346 निवडणूक रोख्यांची खरेदी केली गेली. यापैकी 1,609 रोखे वटवण्यात आले. तसेच 12 एप्रिल 2019 ते 15 फेब्रुवारी 2024 पर्यंत या पाच वर्षांच्या काळात 18,871 निवडणूक रोखे खरेदी केले गेले. तर याच काळात 20,421 रोखे वटवले गेले. भारतीय स्टेट बँकेने दिलेल्या माहितीनुसार, त्यांच्याकडून एकूण 22,217 निवडणूक रोख्यांची खरेदी केली गेली आणि त्यापैकी 22,030 रोखे वटवण्यात आले आहेत.

Exit mobile version