Swati Maliwal on Arvind Kejriwal : आम आदमी पक्षाच्या खासदार स्वाती मालीवाल (Swati Maliwal) यांना मारहाण केल्याप्रकरणी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) यांच्या पीएला अटक करण्यात आली आहे. त्यानंतर आज केजरीवाल आपल्या समर्थकांसह रस्त्यावर उतरले असून ते भाजप (BJP) कार्यालयावर मोर्चा काढत आहेत. दरम्यान, स्वाती मालीवाल यांनी अरविंद केजरीवाल यांच्या रस्त्यावर उतरण्याच्या निर्णयावर अप्रत्यक्ष टीका केली.
इतकी ताकद मनीष सिसोदिया यांच्यासाठी लावायला हवी होती, असा टोला त्यांनी लगावला.
केजरीवाल आज त्यांच्या पक्षाचे नेते आणि कार्यकर्त्यांसह भाजप मुख्यालयावर मोर्चा काढणार आहेत. त्यांच्या या निर्णयावर आपच्या खासदार स्वाती मालीवाल यांनी सोशल मीडियावर पोस्ट केली. त्यात त्यांनी लिहिलं की, एकेकाळी आम्ही सर्वजण निर्भयाला न्याय मिळवून देण्यासाठी रस्त्यावर उतरलो होतो. पण आज 12 वर्षांनंतर अशा आरोपीला वाचवण्यासाठी रस्त्यावर उतरत आहोत, ज्याने सीसीटीव्ही फुटेज गायब केलं आणि फोन फॉरमॅटक केला? इतकी ताकद मनीष सिसोदिया यांच्यासाठी लावली असती तर बरं झालं असतं. आज ते इथं असते तर कदाचित माझ्यासोबत इतकं वाईट झालं नसतं, अशा शब्दात
स्वाती मालीवाल यांनी केजरीवाल यांना अप्रत्यक्षपणे टोला लगावला.
निषेध मोर्चाच्या आधी अरविंद केजरीवाल यांनी पत्रकार परिषदेत घेतली. यावेळी बोलतांना त्यांनी भाजपवर टीका केली. येत्या काही वर्षात भाजपला आपल्यासाठी तगडी स्पर्धा असेल असे वाटत नसल्याने ते आम आदमी पार्टाीला संपण्याचा प्रयत्न करत आहेत, अशी टीका केजरीवाल यांनी केली.
ऑपरेशन झाडू अंतर्गत आप नेत्यांना अटक केली जात आहे. ‘आप’ची खाती जप्त केली जातील. मी खोटे बोलत नाही… ते आता निवडणुकीमुळे जप्त करणार नाहीत. मात्र मतदानानंतर ते जप्ती सुरू करतील आणि आपटे कार्यालये बंद करतील. आपला रस्त्यावर आणण्याचा प्रयत्न करतील, त्यांना वाटतं, ते आपचे नेते आणि आपला संपवू शकतील, मात्र, हा पक्ष म्हणजे करोडो लोकांचा विचार आहे, असं केजरीवाल म्हणाले.