Tahawwur Rana : मुंबईवरील दहशतवादी हल्ल्याचा मास्टरमाइंड तहव्वूर राणाला (Tahawwur Rana) काल भारतात आणण्यात आले. यानंतर त्याला न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने राणाला 18 दिवसांची एनआयए कोठडी सुनावली आहे. एनआयएने राणासाठी वीस दिवसांची कोठडी मागितली होती. सरकारच्या बाजूने वरिष्ठ वकील दयान कृष्णन यांनी तर राणाच्या बाजूने पीयूष सचदेव यांनी युक्तिवाद केला.
तहव्वूर राणाला एनआयएच्या विशेष न्यायालयात हजर करण्यात आले होते. सुनावणी दरम्यान एनआयने कोठडी मागितली यावर न्यायालयाने तहव्वूर राणाला 18 दिवसांची कोठडी सुनावली. आता 18 दिवसांत राणाकडून 26/11 हल्ल्यामागे काय कट होता याची माहिती घेतली जाणार आहे. चला तर मग आतापर्यंत काय काय झालं याची माहिती घेऊ या..
1 तहव्वूर राणाला गुरुवारी सायंकाळी एका विशेष विमानाने अमेरिकेतून भारतात आणण्यात आले. एनआयएने त्याला विमानतळावरच अटक केली. यानंतर त्याची वैद्यकीय तपासणी करण्यात आली. नंतर कडेकोट बंदोबस्तात त्याला पटियाला हाऊस कोर्टात हजर करण्यात आले.
2. न्यायालयात सुनावणीवेळी एनआयएने 20 दिवसांची कोठडी मागितली. न्यायालयाने मात्र राणाला 18 दिवसांची कोठडी दिली. आता न्यायालयाकडे 18 दिवसांचा वेळ आहे. या काळात राणाकडून महत्वाची माहिती गोळा केली जाईल.
3. मुंबईवरील दहशतवादी हल्ल्याची कुणाची भूमिका होती? पाकिस्तानने कसा सपोर्ट केला? दहशतवाद्यांचा उद्देश नेमका काय होता? हेडलीने त्याला कशी साथ दिली या सर्व प्रश्नांची उत्तरे राणाकडून मिळवली जातील.
तहव्वूर राणा हजर होणार.. ते एनआयए कोर्ट सामान्य कोर्टांपेक्षा किती वेगळे? वाचा सविस्तर
4. राणाची पहिली रात्र तर इकडच्या तिकडच्या गोष्टीतच निघून गेली. तो काही वेळ एनआयएच्या मुख्यालयात होता. नंतर त्याला पटियाला हाऊस कोर्टात हजर करण्यात आले. सध्या तो एनआयएच्या मुख्यालयातच आहे. म्हणजेच त्याची पहिली रात्र कधी कोर्ट तर कधी एनआयएच्या मुख्यालयातच गेली.
5. दहशतवादी तहव्वूर राणाला भारतात आणणं हे मोठं यश आहे. राणाच्या तोंडून आता मुंबई हल्ल्यामागचं षडयंत्र समोर येईल. तहव्वूर राणाच्या मदतीनेच दहशतवाद्यांनी 26 नोव्हेंबर 2008 रोजी मुंबईत हल्ला केला होता. लश्कर ए तैयबा आणि पाकिस्तानच्या आयएसआयच्या इशाऱ्यावर हा हल्ला घडवण्यात आला होता.
6. राणा हा पाकिस्तानी वंशाचा कॅनडाचा नागरिक आहे. मुंबई हल्ल्यातील मुख्य सूत्रधार डेविड कोलमन हेडली उर्फ दाउद गिलानीचा राणा हा निकटवर्तीय आहे. हेडली अमेरिकन नागरिक आहे. अमेरिकी सुप्रीम कोर्टाने 4 एप्रिल रोजी तहव्वूर राणाची याचिका फेटाळली होती.
7. एनआयएने अनेत ई मेलसहीत महत्वाच्या पुराव्यांचा हवाला देत राणाची चौकशी करण्यासाठी 20 दिवसांची कोठडी मागितली होती. एजन्सीने न्यायालयाला सांगितले की 2008 मधील हल्ल्यांच्या मागच्या कटाचा शोध घेण्यासाठी राणाची चौकशी गरजेची आहे.
Mumbai Attack : तहव्वूर हुसैन राणाला कसाबसारखीच फाशीची शिक्षा?
8. एनआयएने सांगितले की आरोपी क्रमांक एक डेविड हेडलीने भारत दौऱ्याच्या आधी तहव्वूर राणाबरोबर चर्चा केली होती. हेडलीने त्याच्याकडील वस्तू आणि संपत्तीचा तपशील देत राणाला एक ईमेल पाठवला होता. हेडलीने राणाला पाकिस्तानी नागरिक इलियास काश्मीरी आणि अब्दुर रहमानच्या समावेश असल्याचे सांगितले होते. हे दोन्हीही या प्रकरणात आरोपी आहेत.
9. वरिष्ठ वकील दयान कृष्णन आणि विशेष लोक अभियोजक नरेंद्र मान यांनी एनआयएचे प्रतिनिधीत्व केले. कार्यवाही सुरू होण्याआधी न्यायमूर्तींनी राणाला विचारले की वकील आहे का. यानंतर राणा म्हणाला की माझ्याकडे वकील नाही. यानंतर न्यायमूर्तींनी दिल्ली लीगल सर्व्हिसेस अॅथॉरिटीकडून वकील दिला जात असल्याचे सांगितले.
10. अधिवक्ता पीयूष सचदेवा यांनी तहव्वूर राणाचे प्रतिनिधीत्व करण्यासाठी नियुक्त करण्यात आले. राणाला न्यायालयात हजर करण्याआधी दिल्ली पोलिसांनी सुरक्षेच्या कारणांचा हवाला देत प्रसारमाध्यमे आणि सर्वसामान्य नागरिकांना येथून हटवले होते.