Download App

Senthil Balaji: तामिळनाडूत मुख्यमंत्री-राज्यपाल वाद टोकाला; भ्रष्टाचारी मंत्री परस्पर बडतर्फ

  • Written By: Last Updated:

चेन्नई: तामिळनाडू सरकारमधील मंत्री व्ही. सेंथिल बालाजी (Senthil Balaji) भ्रष्टाचाराच्या प्रकरणात तुरुंगात आहे. मुख्यमंत्री स्टॅलिन यांनी बालाजी यांना मंत्रिमंडळातून काढलेले नसताना राज्यपाल आर. एन. रवी (R. N. Ravi) यांनी मोठा निर्णय घेतला आहे. राज्यपालांनी बालाजी यांची मंत्रिमंडळातून बडतर्फ केले आहे. गुरुवारी राजभवन कार्यालयातून माध्यमांना ही माहिती देण्यात आली आहे.
(Tamil Nadu Governor RN Ravi dismissed Senthil Balaji from the state cabinet)

मुख्यमंत्री स्टॅलिन यांच्यासाठी हा मोठा धक्का मानला जात आहे. त्यामुळे आता तामिळनाडू सरकार व राज्यपाल यांचा वाद टोकाला जाणार असल्याचे बोलले जात आहे. बालाजी यांचे मंत्रिपद तात्काळ प्रभावाने काढण्यात आले. नोकरीसाठी पैसे स्वीकारणे व मनी लाँडरिंगच्या केसमध्ये प्रकरणात बालाजी हे तुरुंगात आहेत. त्यांची ईडी चौकशी करत आहे. तसेच बालाजी यांच्यावर आणखीही गुन्हेगारी स्वरुपाच्या केसेसे आहेत. बालाजी हे मंत्रिमंडळात कायम राहिल्यास कायद्याच्या योग्य प्रक्रियेवर विपरित परिणाम होईल, असे कारण राजभवनातील प्रेसनोटमध्ये देण्यात आलेले आहे.

भारत विरुध्द पाकिस्तान सामना भारतात होणार; मंत्री उदय सामंत काय म्हणाले?

त्यावर आता डीएमके पक्षाकडून तीव्र रोषही व्यक्त होत आहे. डीएमकेचे नेते सरवनन अन्नादुरई यांनी माध्यमांशी बोलताना राज्यपालांनावर आरोप केले आहेत. बालाजी यांना मंत्रिमंडळातून बडतर्फ करणारे राज्यपाल आहेत. त्यांच्याकडे संवैधानिक अधिकार कोणता आहेत. ते सनातन धर्मानुसार कार्य करत आहे. पण सनातन धर्म हा देशाचा कायदा नाही. त्यामुळे राज्यपालांनी संविधान पुन्हा वाचावे. मंत्र्यांना बडतर्फ करण्याचा त्यांना अधिकार नाही. केवळ आपल्या प्रमुखांना खूश करण्यासाठी राज्यपाल हे काम करत असल्याचा आरोप सरवनन अन्नादुरई यांनी केला आहे.


राज्यातून किती मुली बेपत्ता झाल्या? आकडेवारी सांगत पवारांनी टोचले फडणवीसांचे कान

ईडीने १४ जून रोजी बालाजी यांच्यावर पीएमएलए कायद्यांतर्गत अटकेची कारवाई केली होती. ते सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत.

Tags

follow us