आम्ही जनतेच्या कौलाच्या विरोधात जाणार नाही; डीएमकेने फेटाळला एआयडीएमकेचा युतीचा प्रस्ताव

DMK rejects overtures from AIADMK असं करणं जनतेच्या मताचा अनादर आहे. अशी प्रतिक्रिया देत डीएमकेने एआयएडीएमकेच युतीचा प्रस्ताव फेटाळला आहे.

DMK Rejects Overtures From AIADMK

DMK Rejects Overtures From AIADMK

Tamilnadu Assembly Election DMK rejects overtures from AIADMK : तामिळनाडूच्या राजकारणात सध्या अभूतपूर्व अशी परिस्थिती निर्माण झाली असून, अभिनेता ते राजकारणी असा प्रवास करणाऱ्या थलपती विजय यांच्या टीव्हीके पक्षाने मिळवलेले यश हे केवळ निवडणूक निकाल नसून, राज्यातील पारंपरिक राजकारणाला दिलेले मोठे आव्हान मानले जात आहे. या सगळ्या घडामोडींमध्ये सर्वाधिक चर्चेत असलेली बाब म्हणजे डीएमके आणि एआयडीएमके या कट्टर प्रतिस्पर्ध्यांमधील संभाव्य आघाडी.

हा खून पूर्ण पूर्वनियोजित, भाजप या गुंडांना… पीएच्या हत्येनंतर अधिकारी भडकले तर हल्ल्यानंतर टीएमसीची मोठी मागणी

मात्र यावर आता नुकत्याच झालेल्या निवडणुकीत त्रिशंकू परिस्थिती निर्माण झाल्याने तामिळनाडूमध्ये सरकार स्थापन करण्यासाठी एआयएडीएमके ने कायम विरोधी असणाऱ्या डीएमकेला युतीचा प्रस्ताव पाठवल्याच्या चर्चा होत्या. त्यावर आता अखेर डीएमकेची प्रतिक्रिया आली आहे. त्यांनी स्पष्ट सांगितलं आहे की, जनतेच्या कौलाच्या विरोधात आम्ही जाणार नाही. त्यामुळे डीएमके विरोधी पक्षात बसण्यावर ठाम असल्याचा समोर आला आहे.

बंगालमध्ये सत्तास्थापनेपूर्वी रक्तरंजित थरार! भाजपच्या सुवेंदू अधिकारींच्या पीएला गोळ्या घालून संपवलं

डीएमकेचे लोकसभेचे खासदार कलानिधी वीरस्वामी यांनी सांगितलं की, डीएमकेने विरोधी पक्षामध्ये बसण्याचे ठरवलं आहे. तर दुसरीकडे एआयएडीएमके या आघाडीकडून भाजपमार्फत टीव्हीकेची सत्ता स्थापनेचा प्रयत्न रोखण्याचा प्रयत्न केला जात आहे. मात्र असं करणं जनतेच्या मताचा अनादर आहे. अशी प्रतिक्रिया देत डीएमकेने हा प्रस्ताव फेटाळ्याचं सांगण्यात आलं आहे.

Exit mobile version