तामिळनाडूतही विरोधी पक्ष फुटला ! आतापर्यंत सहा आमदारांचे राजीनामे; मुख्यमंत्री विजयची वेगळीच खेळी

Tamil Nadu Politics- माजी परिवहन मंत्री आणि करूर मतदारसंघाचे आमदार एम. आर. विजयभास्कर यांनी आमदारकीचा राजीनामा दिलाय.

  • Written By: Published:
CM VIJAY

Tamil Nadu Politics: महाराष्ट्र, पश्चिम बंगालमध्ये विरोधी पक्ष फुटले आहेत. तेच लोण आता तामिळनाडूमध्ये गेले आहेत. विरोधी पक्ष असलेल्या एआयएडीएमके (AIADMK) पक्षाचा आणखी एक आमदार फुटला आहे. या पक्षाचे आतापर्यंत सहा आमदार फुटले आहेत. या सर्वांनी आमदारकीचा राजीनामा दिला आहे. त्यामुळे हे आमदार पुन्हा निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहेत. यातील काही आमदारांना यापूर्वीच सत्ताधारी टीव्हीके (TVK) पक्षात प्रवेश केला आहे.

तमिळनाडूमध्ये एआयएडीएमके (AIADMK) पक्षाला आणखी एक मोठा धक्का बसला आहे. माजी परिवहन मंत्री आणि करूर मतदारसंघाचे आमदार एम. आर. विजयभास्कर यांनी आमदारकीचा राजीनामा दिलाय. सोमवारी सकाळी राज्य सचिवालयात विधानसभा अध्यक्ष जे. सी. डी. प्रभाकर यांची भेट घेऊन आपला राजीनामा सादर केला. विधानसभा निवडणुकीनंतर एआयएडीएमकेमधून राजीनामा देणारे ते सहावे आमदार ठरले आहेत. त्यामुळे विरोधी पक्षनेते एडप्पडी के. पलानीस्वामी यांच्या अडचणीत आणखी भर पडलीय.

होम्बळे फिल्म्सची मोठी घोषणा! ‘द वन’ सूर्या आणि ‘जय भीम’चे दिग्दर्शक टी. जे. ज्ञानवेल नवी सिनेमासाठी एकत्र

अलीकडील विधानसभा निवडणुकीत एआयएडीएमकेला मोठा पराभव पत्करावा लागला आहे. हा पक्ष राज्यात तिसऱ्या क्रमांकावर घसरला आहे. त्यानंतर पक्षात राजकीय अस्थिरता वाढली आहे. या पूर्वी एआयएडीएमके चार आमदारांनी विधानसभा सदस्यत्वाचा राजीनामा देत सत्ताधारी टीव्हीके पक्षात प्रवेश केला होता. त्यामुळे विरोधी पक्षाची संख्याबळही कमी झाली आहे. दोन आठवड्यांपूर्वी एआयएडीएमके सोडणारे सी. विजयभास्कर हे देखील मुख्यमंत्री विजय यांच्या टीव्हीके पक्षात प्रवेश करण्याची शक्यता आहे.


Ram Mandir : पोलिसांवर विश्वास नाही, सीबीआय चौकशी करा; जनहित याचिकेवर SC ने काय म्हटलं?

एम. आर. विजयभास्कर यांनी माजी मुख्यमंत्री जे. जयललिता यांच्या मंत्रिमंडळात परिवहन मंत्री म्हणून काम पाहिले होते. 2021 च्या विधानसभा निवडणुकीत करूर मतदारसंघातून त्यांचा डीएमकेच्या व्ही. सेंथिल बालाजी यांनी पराभव केला होता. मात्र, 2026 च्या विधानसभा निवडणुकीत त्यांनी पुन्हा करूरमधून विजय मिळवला आहे. या सहाव्या आमदाराच्या राजीनाम्यानंतर तमिळनाडू विधानसभेतील रिक्त जागांची संख्या आता सात झाली आहे. यामध्ये मुख्यमंत्री विजय यांनी रिक्त केलेल्या त्रिची ईस्ट मतदारसंघाचाही समावेश आहे.


टेकू सरकार नको म्हणून विजय यांची खेळी

मुख्यमंत्री विजय यांच्या तमिळगा वेत्री कळघम (TVK) पक्षाचे 108 आमदार निवडून आलेले आहेत. तर डीएमकेचे 73, एआयएडीएमकेचे 53 आमदार निवडून आलेले आहेत. तामिळनाडू विधानसभेची सदस्यसंख्या 234 इतकी आहे. बहुमतासाठी 118 आमदारांची आवश्यकता आहे. टीव्हीके पक्षाला काँग्रेस, सीपीआय, सीपीएम, व्हीसीके आणि इंडियन युनियन मुस्लिम लीग या पक्षांनी पाठिंबा दिला आहे. त्यामुळे सरकारकडे संख्याबळ 120 आमदारांचे झाले आहेत. परंतु यातील काही पक्षांनी पाठिंबा काढून घेतल्यास सरकार पडू शकते, अल्पमतात येऊ शकते. त्यामुळे विजय यांनी विरोधी पक्षाचे आमदार फोडून आपल्या पक्षात घेऊन त्यांना आमदार करण्याची खेळी सुरू केली आहे. त्यामुळे एआयएडीएमकेचे अनेक आमदार फुटण्याची शक्यता आहे.

follow us