बंगालमध्ये सत्तास्थापनेपूर्वी रक्तरंजित थरार! भाजपच्या सुवेंदू अधिकारींच्या पीएला गोळ्या घालून संपवलं
PA of Shubhendu Adhikari shot dead आमदार शुभेंदू अधिकारी यांचे स्वीय सहाय्यक चंद्रनाथ रथ यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली.
West Bengal Assembly Election Bloody thrill before formation of government BJP’s PA of Shubhendu officers shot dead : पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीमध्ये भाजपने ऐतिहासिक विजय मिळवत पहिल्यांदा सत्ता स्थापनेकडे आगे कूच केली आहे. मात्र यापूर्वीच बंगालमध्ये भाजप आणि तृणमूलमध्ये संघर्ष सुरू झाला आहे. या संघर्षामध्ये बुधवारी रात्री एक रक्तरंजित ठराविक घटना घडली. ती म्हणजे भाजपचे पश्चिम बंगालमधील मुख्यमंत्री पदाचे संभाव्य उमेदवार आणि आमदार सुवेंदू अधिकारी यांचे स्वीय सहाय्यक चंद्रनाथ रथ यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली.
तामिळनाडू विधानसभा निकालांनी दिला हंग असेंब्लीचा कौल; विजय विरोधात पारंपरिक विरोध पक्ष येणार एकत्र?
नेमकी घटना काय घडली?
उत्तर परगणा जिल्ह्यातील मध्यमग्राम परिसरामध्ये अधिकारी यांचे पीए चंद्रनाथ रथ हे आपल्या गाडीतून घरी जात होते. त्याचवेळी काही अज्ञात लोकांनी त्यांच्यावर तीन गोळ्या झाडून त्यांची हत्या केली. यापैकी दोन गोळ्या त्यांच्या छातीत शिरल्या आणि त्यांचा जागीच मृत्यू झाला. हे अज्ञात लोक चंदेरी रंगाच्या गाडीमधून आले होते. यामध्ये तिघांचा समावेश होता. त्यांनी रस्त्यात गाडी थांबवली आणि पिस्तुलातून तीन गोळ्या झाडल्या. या गोळ्या खूप जवळून झाडण्यात आल्याने त्या थेट त्यांच्या डोक्यात छातीत आणि पोटात लागल्याने त्यांच्या जागेवरच मृत्यू झाला.
पिंपरी-चिंचवडमधील विरोधी पक्ष ही भाजपची “बी” टीम – चेतन पवार
या घटनेमध्ये चंद्रनाथ रथ यांचा सुरक्षारक्षक देखील जखमी झाला असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दरम्यान रथ हे अधिकारी यांच्या अत्यंत जवळची व्यक्ती म्हणून ओळखले जात होते. गेल्या पाच वर्षांपासून ते त्यांचे पीए म्हणून काम करत होते. तर नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत देखील त्यांनी महत्त्वाची भूमिका पार पाडली. त्यांच्या या हत्येमुळे बंगालमध्ये मोठी खळबळ उडाली आहे. हे घटनेनंतर तातडीने पोलीस तपास सुरू झाला आहे. परिसरात नाकेबंदी आणि हल्लेखोरांचा शोध सुरू असून सीसीटीव्ही फुटेज तपासले जात आहेत.