Download App

Tata Technologies IPO : 20 वर्षानंतर आला टाटाचा IPO, अवघ्या तासाभरातच…

Tata Technologies IPO : तब्बल 20 वर्षानंतर टाटा समूहाचा (Tata group) IPO आज उघडला. या आयपीओची बुधवारी (दि.22) शानदार सुरुवात झाली. यापूर्वी, टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस (TCS) चा शेवटचा IPO 2004 साली शेअर बाजारात (Share Bazar)लिस्ट झाला होता. बाजारातील तज्ज्ञांच्या मतानुसार, हा गेल्या 10 वर्षांतील सर्वाधिक चर्चिला गेलेला IPO ठरला आहे.

प्रफुल्ल पटेलांची खासदारकी रद्द करा, शरद पवार गटाच्या शिष्टमंडळाची उपराष्ट्रपतींकडे मागणी

आज बुधवारी सकाळी 10 वाजता टाटा टेक्नॉलॉजीजचा IPO उघडला आणि अवघ्या तासाभरातच तो पूर्ण भरला. टाटा टेक्नॉलॉजीने या IPO अंतर्गत 60,850,278 शेअर्ससाठी बोली मागवल्या होत्या. सकाळी 10.48 पर्यंत आयपीओ उघडण्याच्या एक तासापूर्वीच 6,04,26,120 शेअर्ससाठी बोली लागल्याचे पाहायला मिळाले. टाटाच्या आयपीओने ग्रे मार्केटमध्ये सर्वाधिक गुंतवणुकदारांना आकर्षित केले.

सरकारी काम अन् अर्धा तास थांबणं भोवलं; न्यायालयाने पोलिसांना दिली गवत कापण्याची शिक्षा

टाटा टेक आयपीओने प्राइस बँड प्रति इक्विटी शेअर 475-500 रुपये निश्चित केले आहे. IPO अंतर्गत लॉट साइज 30 शेअर्सचा आहे. प्राइस बँडनुसार, गुंतवणुकदारांना एका लॉटसाठी किमान 15 हजार रुपयांची गुंतवणूक करावी लागेल. शेअर मार्केटमध्ये कंपनीच्या शेअर्सची लिस्ट येत्या 5 डिसेंबरला होऊ शकते.

या आयपीओसाठी 22 ते 24 नोव्हेंबर 2023 पर्यंत बोली लावू शकणार आहेत. कंपनी IPO च्या माध्यमातून बाजारातून 3042.51 कोटी रुपये गोळा करण्याचा प्रयत्न करत आहे. कंपनीचे शेअर्स BSE आणि NSE वर लिस्ट केले जाणार आहेत. हा शेअर ग्रे मार्केटमध्ये 355 रुपयांच्या प्रीमियमवर पोहोचला आहे.

आज टाटा टेक्नॉलॉजीजचा आयपीओ उघडल्यानंतर 24 नोव्हेंबर 2023 पर्यंत म्हणजेच शुक्रवारपर्यंत बोलीसाठी खुला राहणार आहे. कंपनीने त्याची किंमत 475 ते 500 रुपये प्रति इक्विटी शेअर निश्चित केली आहे. हा IPO 100 टक्के ऑफर फॉर सेल (OFS) साठी उपलब्ध आहे.

आयपीओसाठी एक बोलीदार एका लॉटमध्ये अर्ज करू शकतो. IPO च्या एका लॉटमध्ये कंपनीच्या 30 शेअर्सचा समावेश असेल. किरकोळ गुंतवणूकदाराला बोली लावण्यासाठी किमान 15 हजार रुपये आवश्यक असणार आहेत.

Tags

follow us