Download App

सावधान ! प्रमोशनल कॉल करताय ?, नंबरच होईल बंद; वाचा, TRAI चे नवे नियम

Trai Guidelines For Mobile Number : आपल्याकडे मोबाइल तर आहेच त्यामुळे ही बातमी महत्वाची आहे. टेलिकॉम रेग्युलेटरी अथॉरिट ऑफ इंडिया (TRAI) तुमचा मोबाइल नंबर कदाचित बंद करू शकते. ट्रायने एक नियम तयार केला आहे त्यानुसार तुमचा दहा अंकी मोबाइल नंबर बंद करू शकते.

एका अहवालात दावा करण्यात आला आहे, की ट्राय आता नोंदणी न केलेले मोबाइल नंबर बंद करू शकते. या नंबरवरून कॉल करता येणार नाहीत मेसेजही करता येणार नाहीत.

ट्राय प्रामुख्याने असे दहा अंकी नंबर बंद करण्याच्या विचारात आहे जे व्यावसायिक उद्देशासाठी प्रमोशनल कॉल आणि मेसेज करण्यासाठी वापरात आणले जात आहेत. ट्रायच्या नियमानुसार प्रमोशल उद्देशासाठी वेगळे नंबर दिले जातात. मात्र तुम्ही जर तुमच्या व्यक्तिगत नंबरवरून प्रमोशनल कॉल करत असाल तर तुमचाही नंबर बंद होऊ शकतो.

Thandai : स्पेशल थंडाई रेसिपी

कॉलसाठी आहेत नियम

नॉर्मल कॉलिंग आणि प्रमोशनल कॉलिंगसाठी ट्राय वेगवेगळे नंबर जारी करते. प्रमोशनल कॉलिंगसाठीच्या नंबरमध्ये डिजिटची संख्या जास्त असते त्यावरून युजर्सच्या लक्षात येते की कॉल प्रमोशनल आहे. त्यामुळे हा कॉल रिसीव करायचा किंवा नाही हे संबंधित व्यक्तीला ठरवता येते.

बऱ्याचदा असे होते की युजर्स प्रमोशनल कॉल स्वीकारत नाहीत. त्यामुळे मग नॉर्मल नंबरवरून प्रमोशनल कॉल येऊ लागतात. नॉर्मल नंबरवरून फोन आला की संबंधित व्यक्तीच्याही लक्षात येत नाही की हा कॉल व्यावसायिक प्रमोशनसाठी केला गेला आहे.

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियामध्ये नोकरी करण्याची सुवर्णसंधी, 10 वी उत्तीर्ण उमेदवारही करू शकतात अर्ज

मिळालेल्या माहितीनुसार, या प्रकारांना आळा घालण्यासाठी ट्रायने टेलिकॉम सेवा प्रदात्या कंपन्यांबरोबर चर्चा केली आहे. नियमानुसार जर कोणता व्यक्ती नॉर्मल नंबरवरून प्रमोशनल कॉल करताना आढळून आल्यास त्याचा मोबाइल नंबर पाच दिवसांत बंद केला जाऊ शकतो.

Tags

follow us