Download App

सावधान! भारतात सायबर फ्रॉडचं जाळं; एकाच वर्षात तब्बल 23 हजार कोटींची फसवणूक

मागील वर्षात (2024) सायबर फसवणुकीचे बळी ठरलेल्या लोकांकडून सायबर भामट्यांनी तब्बल 22 हजार 845 कोटी रुपये उकळले आहेत.

Cyber Fraud in India : देशात सायबर अपराधांचे प्रमाण वेगाने वाढत चालले आहे. दररोज (Cyber Fraud in India) कुठेना कुठेतरी सायबर फ्रॉडच्या घटना घडतच असतात. गृह मंत्रालयाने या गुन्ह्यांच्या संदर्भात अतिशय खळबळजनक माहिती लोकसभेत दिली. सरकारी आकडेवारीनुसार मागील वर्षात (2024) सायबर फसवणुकीचे (Cyber Crime) बळी ठरलेल्या लोकांकडून सायबर भामट्यांनी तब्बल 22 हजार 845 कोटी रुपये उकळले आहेत. 2023 मध्ये हा आकडा 7 हजार 465 कोटी रुपये इतका होता. म्हणजेच फक्त एकाच वर्षात या अपराधांच्या प्रमाण 200 टक्के वाढ झाली आहे.

केंद्रीय गृहराज्यमंत्री बंदी संजयकुमार यांनी माहिती देताना सांगितले की नॅशनल सायबर क्राइम रिपोर्टिंग पोर्टल आणि गृह मंत्रालयाच्या अंतर्गत येणाऱ्या सिटिजन फायनान्शियल सायबर फ्रॉड अडँ मॅनेजमेंट सिस्टीमवर (CFCFRMS) 36.40 लाख प्रकरणे नोंदवण्यात आली आहेत.

सन 2023 मध्ये आर्थिक फसवणुकीचे 24.4 लाख प्रकरणे नोंदवण्यात आली होती. याचा अर्थ असा की प्रत्येक वर्षात ऑनलाइन फसवणुकीची प्रकरणे वाढत गेली आहेत. NCRP पोर्टलवर नोंदवलेल्या एकूण सायबर अपराधांत 2024 मध्ये 22.7 लाख प्रकरणे आहेत. 2023 मध्ये 15.9 लाख केस दाखल झाल्या होत्या. ही आकडेवारी धक्कादायक अशीच आहे.

जगभरातील लोक चॅटजीपीटीचे वेडे, दररोज विचारले जात आहेत 250 कोटी प्रश्न!

सरकारने वाचवले लोकांचे पैसे

NCRP द्वारे I4C सन 2019 मध्ये लाँच करण्यात आले होते. तर CFCFRMS प्रणाली 2021 मध्ये सुरू करण्यात आली होती. आर्थिक फसवणुकीची तत्काळ माहिती देणे तसेच पैशांची हेराफेरी रोखण्याच्या उद्देशाने ही व्यवस्था तयार करण्यात आली होती. बंदी संजय कुमार यांनी लोकसभेत माहिती देताना सांगितले की CFCFRMS ने आतापर्यंत 17.8 लाखांपेक्षा जास्त तक्रारींत 5 हजार 489 कोटी रुपयांपेक्षा जास्त पैसे वाचवण्याचे काम केले.

पोलीस अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीच्या आधारावर केंद्र सरकारने 9.42 लाखांहून अधिक सिम कार्ड आणि 2,63,348 IMEI ब्लॉक केले आहेत. सरकारचे Pratibimb मॉडेल गुन्हेगार आणि त्यांच्या नेटवर्कचा नकाशा तयार करण्यात मदत करते. या नकाशाच्या आधारे पोलिसांना या लोकांना पकडण्यात मदत मिळते. या मॉडेलच्या मदतीने पोलिसांनी आतापर्यंत 10 हजार 599 गुन्हेगारांना बेड्या ठोकल्या आहेत.

Cyber Fraud ओळखा या गोष्टी लक्षात ठेवा

संशयास्पद लिंक आणि ई मेलपासून सावध राहा
पासवर्ड अतिशय मजबूत असाच घ्या आणि 2 फॅक्टर ऑथिंटिकेशनकडे लक्ष द्या
सुरक्षित असणाऱ्या वेबसाइटलाच (https) नेहमी भेट द्या.
कोणत्याही परिस्थितीत वैयक्तिक माहिती देऊ नका.
सॉफ्टवेअर आणि डिव्हाइस नेहमी अपडेट ठेवा.
सार्वजनिक ठिकाणच्या वायफायचा वापर आजिबात करू नका.

UPI फ्री मग गुगल पे अन् फोन पे ने 5 हजार कोटी कसे कमावले? जाणून घ्या सिक्रेट!

follow us