Download App

‘तहरीक-ए-हुर्रियत’ दहशतवादी संघटनेवर बंदी; केंद्र सरकारची मोठी कारवाई

Tehreek-e-Hurriyat : जम्मू काश्मीरमध्ये दहशतवादी हल्ल्यांच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने मोठी कारवाई केली आहे. मुस्लिम लीग जम्मू-काश्मीर (मसरत आलम ग्रुप) नंतर तहरीक-ए-हुर्रियतवर (Tehreek-e-Hurriyat) केंद्र सरकारने बंदी घातली आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी ही घोषणा केली आहे. यासंदर्भातील एक्सवर पोस्ट शेअर करण्यात आली आहे. तहरीक-ए-हुर्रियत’ या संघटनेवर इस्लामिक राजवट स्थापित करण्याचा ठपका ठेवत दहशतवादी संघटना म्हणून घोषित करण्यात आली आहे. जम्मू-काश्मीरला भारताकडून वेगळं करण्याचा उद्देश असल्याचं सांगत केंद्र सरकारकडून ही कारवाई करण्यात आली आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांनी एक्सवर पोस्ट शेअर करीत याबाबत माहिती दिली आहे.

या संघटनेच्या माध्यमातून जम्मू-काश्मीरमध्ये फुटीरवादाला प्रोत्साहन देण्याचं कार्य सुरु होतं. ही संघटना भारतविरोधी प्रचार करत असून दहशतवादी कारवायाही करत असल्याचं समोर आलं आहे. यासंदर्भात केंद्रीय मंत्री अमित शाह म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दहशतवादाविरुद्धच्या धोरणांतर्गत, भारतविरोधी कारवायांमध्ये गुंतलेली कोणतीही व्यक्ती किंवा संघटना ताबडतोब उधळून लावणार आहोत. जम्मू-काश्मीरमध्ये कार्यरत असलेल्या मुस्लिम लीग जम्मू-काश्मीर-मसरत आलम गट (MLJK-MA) या राजकीय पक्षाला केंद्र सरकारने UAPA अंतर्गत बेकायदेशीर घोषित केले होते. या पक्षाचे सदस्य जम्मू-काश्मीरमधील दहशतवादी कारवायांमध्ये सहभागी होते आणि देशाच्या अखंडतेला आणि सुरक्षेला धोका निर्माण करणाऱ्या दहशतवादी गटांना पाठिंबा देत असल्याचा आरोप अमित शाह यांनी केला आहे.

INDW vs AUSW : सामनाही गेला मालिकाही गमावली; दुसऱ्या सामन्यात अवघ्या 3 धावांनी भारताचा पराभव

‘मुस्लिम लीग ऑफ जम्मू काश्मीर MLJK-MA ही UAPA अंतर्गत ‘बेकायदेशीर संघटना’ घोषित करण्यात आली आहे. ही संघटना आणि सदस्यांकडून देशविरोधी आणि फुटीरवादी कारवाया होत असल्याचं समोर आलं होतं. एवढंच नाहीतर लोकांना जम्मू आणि काश्मीरमध्ये इस्लामिक राज्य स्थापन करण्यासाठी प्रवृत्त करत असल्याचंही समोर आलं असल्याचं अमित शाह यांनी सांगितलं आहे.

चुम्मा-चुम्मा पुरस्काराचे मानकरी कोण हे…;रोहिणी खडसेंकडून शीतल म्हात्रेंचा खास शैलीत समाचार !

देशाची एकता, सार्वभौमत्व आणि अखंडतेच्या विरोधात काम करणाऱ्या कोणालाही सोडले जाणार नाही, त्याला कायद्याच्या पूर्ण रोषाला सामोरे जावे लागेल. मीडिया रिपोर्ट्सनुसार, आलम विरोधात 27 एफआयआर नोंदवण्यात आले आहेत. त्याच्यावर पीएसए अंतर्गत ३६ वेळा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मार्च 2015 मध्ये, मसरत आलमची सुटका करण्यात आली, ज्यामुळे पीपल्स डेमोक्रॅटिक पार्टी (PDP) च्या विरोधात निदर्शने सुरू झाली, जी त्यावेळी भारतीय जनता पक्षासोबत सत्ताधारी युतीमध्ये असं शाह यांनी स्पष्ट केलं आहे.

follow us

संबंधित बातम्या