Download App

तेलंगणा जिंकण्यासाठी भाजपचा नवा डाव; अमित शाहांनी केली घोषणा

Amit Shah On Telangana Election : तेलंगणामध्ये भाजपची सत्ता आल्यास दलित नेत्याला मुख्यमंत्री करणार असल्याची घोषणा केंद्रीय मंत्री अमित शाह(Amit Shah) यांनी केली आहे. तेलंगणा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अमित शाह यांनी शुक्रवारी काँग्रेससह बीआरएसवर जोरदार हल्लाबोल केला आहे. सूर्यापेट येथील आयोजित सभेत अमित शाह बोलत होते.

Ambadas Danve : विरोधकांच्या दबावामुळेच ललित पाटील प्रकरणाचा तपास; दानवेंनी स्पष्टच सांगितलं

अमित शाह म्हणाले, केसीआर यांना त्यांचा मुलगा केटीआरला मुख्यमंत्री बनवायचे आहे तर सोनिया गांधींना त्यांचा मुलगा राहुल गांधींना पंतप्रधान बनवायचे आहे., दोन्ही कुटुंब वादाचं राजकारण करत असून भाजपची सत्ता तेलंगणामध्ये आल्यास दलित नेत्याला मुख्यमंत्री करणार असल्याचं अमित शाह यांनी स्पष्ट केलं आहे.

‘फडणवीसांनी मनावर घेतल्यावरच आरक्षण मिळणार? भास्कर जाधवचा CM शिंदेंवर निशाणा

जेव्हा काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांच्यासह इतर विरोधी पक्षांचे नेते जात जनगणनेची मागणी करताना इतर मागासवर्गीयांचा (ओबीसी) उल्लेख करून मोदी सरकारला कोंडीत पकडत आहेत. आमच्या चारपैकी तीन मुख्यमंत्री ओबीसी प्रवर्गातून आले आहेत. भाजपच्या दहापैकी फक्त एक मुख्यमंत्री ओबीसी समाजातील असल्याचं राहुल गांधी म्हणाले होते.

धक्कादायक! मराठा आरक्षण न मिळाल्यानं टोकाचं पाऊल, दिवसभरात तिघांनी संपवलं जीवन

गरीबांचं कल्याण हेच भाजपचे उद्दिष्ट असून केसीआर आणि काँग्रेसचे ध्येय कुटुंब कल्याण आहे. कुटुंब कल्याणावर विश्वास ठेवणारे पक्ष तेलंगणाला पुढे नेऊ शकत नाहीत.

Maratha Reservation : ‘जरांगेंनी वेळ दिला होता तेव्हा झोपा काढल्या का?’ मनसे आमदाराचा सरकारला सवाल

पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाखाली फक्त भाजपच तेलंगणाला पुढे नेऊ शकते. भारत राष्ट्र समिती (BRS) किंवा काँग्रेस तेलंगणासाठी चांगले करू शकत नाहीत. तेलंगण आणि राज्याच्या सर्वांगीण विकासासाठी भाजपच भले करू शकणार असल्याचं शाह म्हणाले आहेत. दरम्यान, देशात सध्या पाच राज्यांच्या निवडणुका जाहीर झाल्या आहेत. तेलंगणामध्ये नोव्हेंबरमध्ये निवडणुका पार पडणार आहे. त्यासाठी सर्वच पक्षांकडून जोरदार तयारी सुरु असून भाजपकडूनही रणनीती आखण्यात येत आहे.

भारतीय जनता पक्षाने आपल्या पहिल्या यादीत ५२ उमेदवारांचे नावे जाहीर केली आहेत. यात तीन खासदार आणि १२ महिलांना तिकीट देण्यात आलंय. तर तेलंगणाचे आयटी मंत्री आणि मुख्यमंत्री केसीआर यांच्या मुलगा केटीआरच्या विरोधात सिरसिला जागेवर भाजपने राणी रुद्रमा रेड्डी यांना उमेदवारी दिलीय. तर बीआरएस सोडून भाजपमध्ये दाखल झालेल्या इटेला राजेंद्र यांना हुजुराबाद येथून तिकीट देण्यात आलंय.

Tags

follow us