धक्कादायक! मराठा आरक्षण न मिळाल्यानं टोकाचं पाऊल, दिवसभरात तिघांनी संपवलं जीवन

  • Written By: Published:
धक्कादायक! मराठा आरक्षण न मिळाल्यानं टोकाचं पाऊल, दिवसभरात तिघांनी संपवलं जीवन

Maratha reservation : राज्यात मराठा आरक्षणाच्या (Maratha reservation) मागणीसाठी मराठा समाज आक्रमक झाला आहे. अनेक गावांत राजकीय नेत्यांना गावबंदी केली. मात्र, अद्याप मराठा आरक्षणाचा तिढा सुटला नाही. त्यामुळं अनेक मराठा बांधव टोकाची पावलं उचलत आयुष्य संपवत आहेत. दरम्यान, मनोज जरांगे -पाटील (Manoj Jarange-Patil) आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी समाजबांधवांना आत्महत्या करू नका, असं आवाहनही केलं. यानंतरही आज मराठवाड्यात तीन जणांनी आयुष्याचं संपवलं. हिंगोली, जालना आणि छत्रपती संभाजीनंगर जिल्ह्यात ह्या घटना घडल्या आहेत.

SL vs ENG: गतविजेत्या इंग्लंडचे पॅकअप? लंकेकडूनही झाला मोठा पराभव 

मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांनी अंतरवली सराटी गावात मोठं उपोषण केलं होतं. मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण द्या, अशी मागणी जरांगे पाटलांनी केली. त्यानंतर सरकारने नमतं घेत आरक्षणाचा प्रश्न सोडवण्यााठी ४० दिवसांची मुदत मागितली. खुद्द मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आंदोलनस्थळी भेट देऊन हा वेळ मागितला होता. त्यानंतर आता ४० दिवस उलटून गेले, तरीही आरक्षणाचा प्रश्न मार्गी लागला नाही.

दरम्यान, मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा समाज आणखी आक्रमक झाला आहे. मराठा आरक्षणासाठी आता मराठा समाजाने आर-पारची लढाई सुरु केली आहे. आरक्षणाचा प्रश्न न सुटल्यानं काल पासून जरांगेंनी अंतरवली सराटीत बेमुदत उपोषण सुरू केलं. मराठवाड्यातील अनेक गावांमध्ये साखळी उपोषण आणि नेत्यांना गावबंदी करत जरागेंना पाठिंबा दिला. यातच आज मराठवाड्यात आरक्षणासाठी तीन तरुणांनी आत्महत्या करून जीवनयात्रा संपवली.

मराठवाड्यात आज मराठा युवकाच्या आत्महत्येची पहिली घटना हिंगोली जिल्ह्यातून पुढं आली. आखाडा बाळापूर तालुक्यातील कृष्णा उर्फ ​​लहू यशवंतराव कल्याणकर या २५ वर्षीय तरुणाने आज सकाळी अकार वाजण्याच्या सुमारास देवजना शिवारात बाभळीच्या झाडाला गळफास घेऊन जीवनयात्रा संपवली. कृष्णा शेतमजूर आणि ट्रॅक्टर चालक म्हणून काम करत होता.

कृष्णाकडून पोलीसांना एक सुसाईट नोट सुध्दा मिळाली आहे. यामध्ये त्यांने मराठा आरक्षणा न मिळाल्यानं आत्महत्या करत असल्याचं लिहिलं होतं.

दुसरी घटना जालना जिल्ह्यात घडली. मराठा आरक्षण न मिळाल्याच्या भावनेने व्यथित होऊन घनसावंगी तालुक्यातील अंतरवली टेंभी येथील शिवाजी अण्णाकिसन माने (४५) यांनी टोकाचे पाऊल उचलले. माने यांनी आज सकाळी साडेअकरा वाजता राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली.

आजची तिसरी घटना छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात घडली. मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी जरांगे यांच्या आंदोलनात सक्रिय सहभागी असलेल्या गणेश काकासाहेब कुबेर (२८) याने आज दुपारी राहत्या घरात गळफास घेत मृत्युला कवटाळले. यामुळे खळबळ उडाली आहे. घटनास्थळी चिखलठाणा पोलीस, उपविभागीय पोलीस अधिकारी, नायब तहलिलदार यांच्यासह प्रशासनाचे अधिकारी पोहचले आहे. मात्र, गावकऱ्यांनी आक्रमक भूमिका घेतली. त्यांनी आत्महत्या करणाऱ्या तरुणाच्या पत्नीला सरकारी नोकरी देण्यचाी मागणी केली.

आत्महत्येपूर्वी त्याने एका बोर्डवर मराठा समाजाला आरक्षण मिळत नाही, तोपर्यंत माझा मृतदेह जाळू नका, असं लिहिलं. दरम्यान, या घटनेचा तपास पोलीस करत आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube