Telangana Election: तेलंगणा विधानसभा निवडणुकीत (Telangana Election 2023) चेन्नूर येथील काँग्रेसचे उमेदवार जी विवेकानंद (G Vivekananda) हे 600 कोटी रुपयांपेक्षा जास्त संपत्ती असलेले सर्वात श्रीमंत उमेदवार आहेत. सोबतच काँग्रेसचे पी श्रीनिवास रेड्डी (P Srinivasa Reddy) यांचा 460 कोटी संपत्ती असल्याने दुसऱ्या क्रमांकावर आहेत. विवेक आणि त्यांच्या पत्नीकडे 377 कोटी रुपयांची जंगम मालमत्ता आहे, ज्यात त्यांच्या स्वतःच्या विसाका इंडस्ट्रीजसह विविध कंपन्यांचे शेअर्स आहेत. कुटुंबाची स्थावर मालमत्ता 225 कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे.
प्रतिज्ञापत्रातून मिळालेल्या माहितीनुसार, विवेक आणि त्याच्या पत्नीवर 41.5 कोटी रुपयांचे कर्ज आहे. विवेकचे वार्षिक उत्पन्न गेल्या आर्थिक वर्षात वाढून 6.26 कोटी रुपये झाले आहे. तसेच 2019 मध्ये 4.66 कोटी रुपये होते, तर त्याच्या पत्नीचे वार्षिक उत्पन्न याच कालावधीत 6.09 कोटी रुपयांवरून 9.61 कोटी रुपये झाले आहे.
पल्यार विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवणारे पी श्रीनिवास रेड्डी यांनी 44 कोटी रुपयांच्या दायित्वांसह 460 कोटी रुपयांची जंगम आणि स्थावर मालमत्ता जाहीर केली आहे. 9 नोव्हेंबर रोजी उमेदवारी अर्ज भरण्याच्या दिवशी प्राप्तिकर विभागाने हैदराबाद आणि खम्मम येथील श्रीनिवास रेड्डी यांच्या निवासस्थानांची आणि कार्यालयांची झडती घेतली आहे. रेड्डी यांनी सांगितले आहे की, ही कार्यालयांची झडती राजकीय हेतूने घेतली गेली आहे. तेलंगणातील 119 जागांसाठी 4,798 उमेदवारांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत.
Ajit Pawar : दिवाळी संपताच अजितदादांची खलबत; निधी वाटपावरून आमदारांची नाराजी दूर होणार?
काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी बेरोजगारी आणि महागाईच्या मुद्द्यांवरून केंद्र सरकारवर जोरदार निशाणा साधला आणि सरकार आणि भारतीय जनता पक्ष देशातील लाखो तरुणांच्या स्वप्नांचा चुराडा करत असल्याचा गंभीर आरोप केला. खर्गे यांनी सोशल मीडिया पोस्टमध्ये लिहिले की, जेव्हा पंतप्रधान तेलंगणात बोलत होते, तेव्हा एक अतिशय अस्वस्थ करणारे दृश्य समोर आले.
देशासमोरील अनेक समस्यांकडे लक्ष वेधण्यासाठी एक मुलगी विजेच्या खांबावर चढली. मोदी सरकारच्या विश्वासघाताला लाखो तरुणवर्ग कंटाळला आहे, असा दावा त्यांनी यावेळी केला आहे. त्यांना नोकऱ्यांची आकांक्षा होती, परंतु त्याऐवजी त्यांना 45 वर्षांत सर्वाधिक बेरोजगारी व वाढत आहे. त्यांना आर्थिक सक्षमीकरण हवे होते, परंतु त्या बदल्यात भाजपने त्यांना जबरदस्त महागाई दिली. ज्यामुळे त्यांची बचत ४७ वर्षांच्या नीचांकावर आली. सर्वात श्रीमंत पाच टक्के भारतीय नागरिकांकडे भारतातील 60 टक्क्यांहून अधिक संपत्ती आहे, तर मध्यमवर्गीय आणि गरीब लोक मोठ्या प्रमाणात त्रस्त आहेत.