Ajit Pawar : दिवाळी संपताच अजितदादांची खलबत; निधी वाटपावरून आमदारांची नाराजी दूर होणार?

Ajit Pawar : दिवाळी संपताच अजितदादांची खलबत; निधी वाटपावरून आमदारांची नाराजी दूर होणार?

Ajit Pawar : राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते अजित पवार (Ajit Pawar) यांचा गट सत्तेत जरी सामिल झाला असला तरी त्यांच्यामध्ये नाराजी असल्याची चर्चा नेहमीच होते. त्यात आता अजित पवार पुन्हा एकदा आपल्या गटाच्या आमदारांची नाराजी दूर करण्यासाठी प्रयत्न करत आहेत. यावेळी राष्ट्रवादीचे आमदार नाराज होण्याचं कारण म्हणजे निधी. निधी मिळत नसल्याने आमदार नाराज आहेत. त्यावर तोडगा काढण्यासाठी दिवाळी संपताच अजितदादांची खलबत सुरू झाली आहेत.

Maharashtra Weather Update : आज राज्यात तापमान घटणार; हवामान विभागाने व्यक्त केला अंदाज

दरम्यान नगरविकास, ग्रामविकास, सामाजिक न्याय अशा विविध खात्यांकडून आमदारांच्या मतदारसंघातील कामांसाठी पुरेसा निधी मिळत नसल्याचा आरोप राष्ट्रवादीचे आमदार करत आहेत. त्यातून अजित पवार गटाच्या आमदारांमध्ये अस्वस्थता देखील असल्याची चर्चा आहे. त्यामुळे ही नाराजी दूर करण्यासाठी राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी पुढील आठवड्यात बैठक बोलावली आहे.

IND VS NZ : सेमीफायनलच्या तिकीटांचा काळाबाजार; चौपट दरांत विक्री करणारा एक जण ताब्यात

दरम्यान महाविकास आघाडीच्या काळात याच कारणामुळे एकनाथ शिंदे गटाचे आमदार नाराज होते. त्यात आता महायुतीमध्ये तीच परिस्थिती अजित पवार यांच्या गटाची झाली आहे. मात्र दुसरीकडे अर्थ खातंही अजित पवार यांच्याकडेच आहे. तरीही त्यांचेच आमदार नाराज आहेत. त्यामुळे दिल्लीमध्ये जेव्हा अजित पवारांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली तेव्हा देखील अजित पवारांनी निधीमध्ये डावलले जात असल्याचे त्यांच्या निदर्शनास आणून दिले होते. असे देखील सांगण्यात येते.

दरम्यान आता या प्रकरणावर तोडगा काढण्यासाठी आपल्या नाराज आमदारांना मार्गदर्शन करण्यासाठी अजित पवारांनी 21 नोव्हेंबरला एक बैठक बोलावली आहे. त्यांच्या या बैठकीनंतर अजित पवारांच्या आमदारांची नाराजी दूर होणार का? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. त्यात गेल्या दिवसांपासून स्वतः अजित पवार देखील तब्बेतीच्या कारणामुळे माध्यमांपासून दूर आहेत. दरम्यान अजित पवारांच्या या नाराजीवर विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी देखील टीका केली होती.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube