ईडीची मोठी कारवाई! बॅंक घोटाळा प्रकरणी माजी आमदाराची 152 कोटींची मालमत्ता जप्त

  • Written By: Published:
ईडीची मोठी कारवाई! बॅंक घोटाळा प्रकरणी माजी आमदाराची 152 कोटींची मालमत्ता जप्त

Karnala Bank Scam : गेल्या काही दिवसांपासून ईडीने अनेक ठिकाणी कारवाया केल्या. आजही ईडीने (ED) सर्वात मोठी कारवाई केली आहे. कर्नाळा बँक घोटाळा (Karnala Bank Scam) प्रकरणी शेतकरी कामगार पक्षाचे माजी आमदार विवेकानंद पाटील (Vivekananda Patil) यांची 152 कोटी रुपयांची मालमत्ता ईडीने आज जप्त केली. त्यामुळं राज्यात एकच खळबळ उडाली आहे.

World Cup 2023 : ऑस्ट्रेलियाचा सलग दुसरा पराभव; दक्षिण आफ्रिकेने 134 धावांनी उडविला धुव्वा 

कर्नाळा बँक घोटाळ्यातील विवेकानंद पाटील हे प्रमुख आरोपी आहेत. ते कर्नाळा बॅंकेच चेअरमन होते. या बॅंकेत कोट्यावधींचा घोटाळा झाला होता. या घोटाळ्याचा आरोप विवेकानंद पाटील आणि त्यांच्या सहकाऱ्यावर आहे. यापूर्वी, ईडीने त्यांची 234 कोटी रुपयांची स्थावर मालमत्ता तसेच त्यांच्या गाड्या जप्त केल्या होत्या. आता ईडीने पुन्हा मोठी कारवाई केली आहे. या कारवाईमध्ये कर्नाळा नागरी सहकारी बँक लिमिटेडचे ​​माजी अध्यक्ष, त्यांचे नातेवाईक आणि कर्नाळा महिला रेडीमेड गारमेंट्स सोसायटी लिमिटेड यांच्य मालकीची स्थापवर मालमत्ता तात्पुरती जप्त करण्यात आली आहे.

बँक फसवणूक प्रकरणाच्या संदर्भात ईडीने जमीन, बंगला, निवासी संकुल इत्यादींच्या स्वरुपात तब्बल 152 कोटी (अंदाजे) रुपयांची मालमत्ता जप्त केली. ही कारवाई आज दुपारी करण्यात आली. विवेकानंद पाटील यांच्यावर बँकेत 60 बनावट खाती उघडून त्यामार्फत 560 कोटींचा घोटाळा केल्याचा आरोप आहे.

रिझर्व्ह बँकेला कर्नाळा नागरी सहकारी बँकेच्या व्यवहारात अनियमितता निदर्शनास आल्यानं त्यांनी सहकार आयुक्तांना चौकशीचे आदेश दिले होते. चौकशी अंती 60 बनावट कर्जखात्याद्वारे पाटील यांनी 560 कोटींचा घोटाळा केल्याचं स्पष्ट झालं होतं. गैर मार्गाने बॅंकेतून कोट्यावधी रुपयांच्या ठेवी उचलून बॅंकेत गैरव्यवहार केल्यानं 2017 मध्ये त्यांच्यावर गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात आली होती.

दरम्यान, या प्रकरणात आता पुढं काय होतं, हेच पाहणं महत्वाचं आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube