Download App

Telangana Election Result : तेलंगणातील 10 व्हीआयपी जागा; केसीआर, रेड्डी अन् राजा गुलाल कोण उधळणार?

Telangana Election Result : देशातील पाच राज्यांच्या निवडणुकीचे निकाल आज सकाळपासून (Telangana Election Result) येत आहेत. मध्य प्रदेश, राजस्थान, छत्तीसगड या तीन राज्यात भाजप आणि काँग्रेस यांच्यात काट्याची टक्कर दिसून येत आहे. तर दुसरीकडे तेलंगाणा राज्य निर्मितीपासून सत्ता काबीज केलेल्या केसीआर यांच्या बीआरएसला (BRS) धक्का देण्याची तयारी काँग्रेसने केली आहे. सध्याच्या कलात काँग्रेस (Congress) आघाडीवर दिसत आहे. एक्झिट पोलमधील निष्कर्षानुसार राज्यात काँग्रेसची सत्ता येईल असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. या निवडणुकीत स्वतः मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव, काँग्रेसचे दिग्गज नेते रेवंथ रेड्डी, एमआयएमचे असदुद्दीन ओवैसी आणि भाजपाचे राजा या उमेदवारांच्या भवितव्याकडे लक्ष लागले आहे.

Telangana Election : 35 वर्षात तब्बल 237 निवडणुका; KCR यांना टक्कर देणारा ‘इलेक्शन किंग’ कोण?

या निवडणुकीत भाजप आणि एमआयएम बीआरएसचा खेळ बिघडवू शकतात. तसेच राज्यातील दहा महत्वाच्या जागांचे निकाल काय असतील याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. कारण या ठिकाणी चुरशीची लढत होऊ शकते. या कोणत्या जागा आहेत याची माहिती घेऊ या..

गजवेल

सिद्धपेट जिल्ह्याती गजवेल ही जागा अतिशय महत्वाची आहे. मुख्यमंत्री केसीआर येथे निवडणूक लढत आहेत. भाजपने आमदार एटेला राजेंद्र यांनी तिकीट दिलं आहे. तर काँग्रेसने टीएन रेड्डी यांना तिकीट दिलं आहे. 2018 च्या निवडणुकीत सीएम राव यांनी ही जागा जिंकली होती.

करीमनगर

करीमनगर विधानसभा मतदारसंघात बीआरएसने मंत्री गंगुला कमलाकर यांना तिकीट दिले आहे. त्यांच्या विरोधात भाजपने माजी प्रदेशाध्यक्ष बंदी संजयकुमार यांना उमेदवारी दिली. संजयकुमार सध्या खासदारही आहेत.

कोरुतला

या मतदारसंघात निजामाबादमधून खासदार अरविंद धर्मपुरी यांना भाजपने तिकीट दिलं आहे. तर बीआरएसने डॉ. संजय कलवकुंतला यांना उमेदवारी दिली आहे. तर काँग्रेसने जेएन राव यांच्यावर नशीब आजमावले आहे. मागील निवडणुकीत कोरुतला जागा बीआरएसकडे होती.

Rajasthan Elections : ..तर PM मोदीही वसुंधराराजेंना रोखू शकणार नाहीत; राजस्थानचं गणितच बदललं

गोशामहल

हा मतदारसंघ नेहमीच चर्चेत असतो. येथे भाजपाने वादग्रस्त नेते टी राजा सिंह यांना तिकीट दिलं आहे. तर बीआरएसने नंदकिशोर व्यास यांना तर मोगिली सुनिता यांना काँग्रेसने तिकीट दिलं आहे. 2018 च्या निवडणुकीत राज सिंह विजयी झाले होते.

जुबली हिल्स

टीम इंडियाचे माजी कर्णधार अझरुद्दीन या मतदारसंघातून निवडणूक लढत आहेत. त्यांना काँग्रेसनं तिकीट दिलं आहे. बीआरएसचे गोपीनाथ त्यांच्या विरोधात आहेत. भाजपने दीपक रेड्डी यांना उमेदवारी दिली आहे. मागील निवडणुकीत ही जागा बीआरएसने जिंकली होती.

सिरिसिल्ला

या मतदारसंघात तेलंगणाचे उद्योगमंत्री केटी रामाराव रिंगणात आहेत. त्यांच्या विरोधात भाजपने राणी रुद्रम रेड्डी यांना तिकीट दिलं आहे. तर काँग्रेसने केके महेंद्र रेड्डी यांना रिंगणात उतरवलं आहे. केटी रामाराव हे मु्ख्यमंत्री केसीआर यांचे चिरंजीव आहेत.

नरसापूर

या विधानसभा मतदारसंघात सुनीता लक्ष्मी रेड्डी रिंगणात आहेत. मुरली यादव यांना भाजपने तर राजी रेड्डी यांना काँग्रेसने तिकीट दिलं आहे. मागील निवडणुकीत या मतदारसंघात बीआरएसचे सी मदन रेड्डी विजयी झाले होते.

Election Results Live : BJP चा काँग्रेसवर ट्रिपल अटॅक, MP-राजस्थान, छत्तीसगडमध्ये मोठी आघाडी

चंद्रायनगुट्टा

या मतदारसंघात एमआयएमने असदुद्दीन ओवैसी यांचे बंधू अकबरुद्दीन ओवैसी यांना तिकीट दिलं आहे. बीआरएसने एम. सीताराम रेड्डी तर काँग्रेसने बोया नागेश यांना तसेच भाजपने के. महेंद्र यांना तिकीट दिलं आहे. या मतदारसंघात चौरंगी लढत होत आहे. मागील निवडणुकीत ओवैसी विजयी झाले होते.

सिद्दीपेट

या मतदारसंघात बीआरएसने मंत्री तनारू हरीश राव यांनाच रिंगणात उतरवले आहे. त्यांच्याविरोधात भाजपाने श्रीकांत रेड्डी यांना तर काँग्रेसने पी. हरिकृष्ण यांना उमेदवारी दिली आहे. मागील निवडणुकीत हरीश राव विजयी झाले होते.

कामरेड्डी

या मतदारसंघात मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव निवडणूक लढत आहेत. त्यांच्या विरोधात भाजपाने वेंकट रामण्णा रेड्डी यांना तिकीट दिलं आहे. काँग्रेसने ए.व्ही. रेड्डी यांना उमेदवारी दिली आहे.

follow us