Election Result LIVE : जनता जनार्दन! तीन राज्यातील बंपर विजयानंतर मोदींचं पहिलं ट्विट

  • Written By: Published:
Election Result LIVE : जनता जनार्दन! तीन राज्यातील बंपर विजयानंतर मोदींचं पहिलं ट्विट

Assembly Election Results Live Update  : लोकसभा निवडणुकांची सेमीफायनल म्हणून बघितली गेलेली राजस्थान, मध्यप्रदेश, छत्तीसगड आणि तेलंगणा या चार राज्यांची मतमोजणी सुरू आहे. आतापर्यंत हाती आलेल्या निकालांनुसार छत्तीसगड, राजस्थान आणि मध्य प्रदेशात भाजपनं विजयाकडे वाटचाल केली आहे. तर, तेलंगणात बीआरएसला धोबीपछाड करत काँग्रेसनं आघाडी घेतली आहे. मतमोजणीच्या रिअल टाईम अपडेटसह विविध अँगलच्या बातम्या देणारा लेट्सअपचा लाईव्ह ब्लॉग…

LIVE NEWS & UPDATES

  • 03 Dec 2023 04:52 PM (IST)

    जनतेला सलाम, 3 राज्यात भाजपच्या बंपर विजयानंतर मोदींचं ट्विट

    मध्य प्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगडमध्ये भाजपच्या बंपर विजयानंतर पीएम मोदींनी ट्विट करत जनता जनार्दन म्हणत जनतेचे आभार मानले आहेत. मध्य प्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगडच्या निवडणूक निकालांवरून भारतातील जनतेचा विश्वास केवळ सुशासन आणि विकासाच्या राजकारणावर असून, त्यांचा विश्वास भाजपवर असल्याचे मोदींनी ट्विटमध्ये म्हटले आहे. भाजपवर प्रेम, विश्वास आणि आशीर्वाद दिल्याबद्दल मोदींनी तिन्ही राज्यातील माता, भगिनींसह तरुण मतदारांचे मनःपूर्वक आभार मानले आहेत.

     

  • 03 Dec 2023 04:33 PM (IST)

    छत्तीसगडचा निकाल धक्कादायक- संजय राऊत

    पाच पैकी चार राज्यांचे आज निकाल लागले. तेलंगणात काँग्रेसने जिंकलं हे अनपेक्षितपणे आहे. तेलंगणामध्ये MIM केसीआर फॅक्टर चालला नाही. राहुल गांधी प्रियांका गांधी यांनी जोरदार प्रचार केला. राजस्थान मध्ये दर पाच वर्षांनी नवीन सरकार येतं. छत्तीसगडचा निकाल धक्कादायक आहे. अशोक गेहलोत यांनी चांगलं काम केलं. पण मतदारांनी तिथे सरकार बदलण्याची परंपरा कायम ठेवल्याचं संजय राऊत म्हणाले.

  • 03 Dec 2023 03:49 PM (IST)

    अशोक गहलोत संध्याकाळी साडेपाच वाजता राज्यपालांकडे राजीनामा सादर करतील

    Rajasthan Election Result 2023 : मुख्यमंत्री अशोक गहलोत (Ashok Gehlot) संध्याकाळी 5.30 वाजता राज्यपालांना भेटण्यासाठी राजभवनात पोहोचतील आणि त्यांचा राजीनामा सादर करतील. राजस्थानमध्ये भाजप विजयाकडे वाटचाल करताना दिसत आहे. ट्रेंडमध्ये भाजप काँग्रेसपेक्षा खूप पुढे असून त्यांनी बहुमताचा आकडा पार केला आहे. अशा स्थितीत सध्याचे काँग्रेसचे सरकार जाणार हे आता निश्चित झाले आहे. त्यामुळे, मुख्यमंत्री अशोक गहलोत राज्यपाल कलराज मिश्रा यांची भेट घेतील आणि त्यांना राजीनामा सुपूर्द करतील.

  • 03 Dec 2023 03:27 PM (IST)

    आजच्या निकालाच विश्लेषण म्हणजे मोदींच्या गॅरांटीवर जनतेचा विश्वास- विनोद तावडे

    आजच्या निकालाच विश्लेषण म्हणजे मोदींच्या गॅरांटीवर जनतेचा विश्वास. मोदींमुळे विजय मिळाला आहे. राहुल गांधींच्या यात्रेचं काय परिणाम झाला. विधानसभा आणि लोकसभा निवडणूक वेगवेगळी असते. राजस्थानमध्ये दलित महिलेवर अत्याचार आणि मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार झाला- विनोद तावडे

  • 03 Dec 2023 02:48 PM (IST)

    Rajasthan Election Results 2023 : राजस्थानमधील भाजपचा आश्वासक चेहरा वसुंधरा राजे विजयी

    राजस्थानच्या झालारपाट मतदार संघातून भाजपच्या वसुंधरा राजे विजयी झाल्या आहेत. ५३ हजार १९३ मते मिळवून त्यांनी काँग्रेसचे रामलाल चौहान यांचा पराभव केला.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube