Download App

Accident : मध्यप्रदेशात बसचा भीषण अपघात, 13 जणांचा मृत्य तर…

  • Written By: Last Updated:

नवी दिल्ली : मध्य प्रदेशातील (Madhya Pradesh) सिधी जिल्ह्यात भीषण अपघात (Road Accident) झाला आहे. भरधाव ट्रकने तीन बसला टक्कर दिल्याने झालेल्या अपघातात 13 जण ठार तर 50 हुन अधिकजण जखमी झाले असल्याची माहिती समोर येत आहे. अपघातातील जखमींना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार जखमींमधील 15-20 जणांची प्रकृती चिंताजनक आहे. घटनास्थळी बचावकार्य सुरु आहे.

अधिक माहिती अशी, मध्य प्रदेशमधील रीवा आणि सिधी जिल्ह्याच्या सीमेवर शुक्रवारी रात्रीच्या सुमारास ही मोठी दुर्घटना घडली आहे. एका भरधाव वेगाने ट्रकने तीन बसला जोरदार धडक दिली. या अपघातामध्ये 13 जणांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. तर या भीषण अपघातात 50 हुन अधिकजण जण जखमी झाले. जखमींवर रीवा आणि सिद्धी येथील रुग्णालयामध्ये उपचार सुरु आहेत. यामधील अनेकांची प्रकृती चिंताजनक आहे.

मुख्यमंत्र्यांकडून सांत्व
मध्यप्रदेशात घडलेल्या या भीषण अपघातानंतर राज्याचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी शुक्रवारी रात्री उशिरा रेवा येथील संजय गांधी मेमोरियल हॉस्पिटलला भेट दिली. मुख्यमंत्र्यांनी जखमींची भेट घेऊन कुटुंबीयांचे सांत्वन केले.

Raj Thackeray : नामांतरावर राज ठाकरे म्हणाले… ‘…हेच खरं हिंदवी सुराज्य !’

अमित शाहांच्या कार्यक्रमानंतर परतत होत्या बस
मिळालेल्या माहितीनुसार सतना येथे आयोजित कोल महाकुंभातील केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या कार्यक्रमानंतर या बसेस परतत होत्या. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या रॅलीनंतर लोक बसमध्ये चढत होते. अपघाताच्या वेळी बस रस्त्याच्या कडेला उभ्या होत्या. त्याचवेळी भरधाव वेगात असलेल्या ट्रकचा टायर फुटल्यामुळे हा अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे.

Tags

follow us