Download App

Terror-Gangster Network : खलिस्तानी दहशतवाद्यांविरोधात NIA अ‍ॅक्शन मोडमध्ये; माहिती देणाऱ्यास 10 लाखांचं बक्षीस जाहीर

Terror-Gangster Network : खलिस्तानी दहशतवाद्यांनी कॅनडास्थित भारतीयांना धमकावल्याचे प्रकार समोर आल्यानंतर आता राष्ट्रीय तपास यंत्रणा(NIA) अ‍ॅक्शन मोडमध्ये उतरल्याचं पाहायला मिळत आहे. खलिस्तानी दहशतवादी आणि गॅंगस्टर्सचे फोटोंसह नावं जाहीर करुन त्यांची माहिती अथव मालमत्ता आणि व्यवसायाची माहिती देणाऱ्यास 10 लाख रुपयांचं बक्षीस जाहीर केलं आहे.

पदवीधरांना सुवर्णसंधी! मुंबई महानगरपालिकेत कार्यकारी सहाय्यक पदासाठी भरती सुरू, ‘या’ तारखेपर्यंत करा अर्ज

कॅनडासह इतर ठिकाणी सक्रिय असलेल्या खलिस्तानी दहशतवादी आणि गॅंगस्टर्स यांची मालमत्ता अथवा व्यवसाय तसेच त्यांच्या नातेवाईकांच्या नावे असलेल्या मालमत्तेची माहिती असल्यास माहितीदाराने व्हॉट्सअप नंबरवर आम्हाला संपर्क करावा, यासंदर्भातील व्हॉटस्अप नंबरही एनआयएकडून जारी करण्यात आला आहे.

Dhule News : गणेशोत्सवानंतर पडळकरांना काळंच फासणार; अजितदादा समर्थकांनी पेटवलं रान…

18 जून रोजी ब्रिटीश कोलंबियामधील सरे येथील गुरुद्वाराबाहेर निज्जर या खलिस्तान दहशतवाद्याची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. त्यानंतर कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रूडो यांनी हरदीपसिंग निज्जरच्या हत्येमध्ये भारत सरकारचा हात असल्याचा आरोप केला. या आरोपानंतर एकच खळबळ उडाली आहे. या संपूर्ण घडामोडींनतर एनआयएकडून ही मोहिम हाती घेण्यात आली आहे.

Horoscope Today: ‘या’ राशींना गणपती बाप्पा पावणार! ३ ग्रहांचे भक्कम पाठबळ; जाणून घ्या आजचा दिवस

एनआयएकडून जाहीर करण्यात आलेल्या खलिस्तानी दहशतवादी भारतातून फरार झालेले असून ते परदेशातून आपलं दहशतीचे नेटवर्क सांभांळ आहेत. फरार दहशतवाद्यांच्या मदतीनेच भारतात दहशतवादी कारवाया करणाऱ्या काही टॉप मोस्ट गँगस्टर्सची नावे आणि फोटोंचा समावेश आहे. त्यापैकी बरेच जण अमेरिका, कॅनडा, ऑस्ट्रेलिया आणि ब्रिटनमध्ये राहतात.

भीषण अपघात! कार आणि कंटेनरच्या धडकेत भाजपच्या नगरसेवकचा मृत्यू, राजकीय वर्तृळात शोककळा

दरम्यान, एनआयएने भारतात सक्रिय असलेल्या खलिस्तानी दहशतवाद्यांविरोधात कडक कारवाईची घोषणा केली आहे. भारतात बब्बर खालसा इंटरनॅशनलच्या (बीकेआय) दहशतवादी कारवायांना प्रोत्साहन देणाऱ्या दोन लिस्टेड दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्याला प्रत्येकी 10 लाख रुपयांचे बक्षीस जाहीर करण्यात आले आहे. हरविंदर सिंग संधू (उर्फ रिंदा) आणि लखबीर सिंग संधू (उर्फ लांडा) अशी आरोपींची नावे आहेत.

खलिस्तानी दहशतवादी हरदीप सिंग निज्जर (Hardeep Singh Nijjar) याची कॅनडामध्ये गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. या हत्येचा कट भारताने रचला असल्याचा सनसनाटी आरोप कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रूडो (Prime Minister Justin Trudeau) यांनी केला आहे.. त्यानंतर दोन्ही देशांमधील संबंधात कटूता निर्माण झाली. दोन्ही देशांकडून एकमेकांच्या राजदुतांची हकालपट्टी करण्यात आली. दरम्यान, आता कॅनडातील ‘सिख फॉर जस्टिस’ संघटनेचा म्होरक्या गुरपतवंत सिंग पन्नू (Gurpatwant Singh Pannu) याने भारतीयांना धमकावत त्यांना कॅनडा सोडण्याचे फर्मान सुनावले.

Tags

follow us