पदवीधरांना सुवर्णसंधी! मुंबई महानगरपालिकेत कार्यकारी सहाय्यक पदासाठी भरती सुरू, ‘या’ तारखेपर्यंत करा अर्ज
Mumbai Municipal Corporation Bharti 2023: आज प्रत्येकालाच सरकारी नोकरी हवी आहे. प्रत्येकजण सरकारी नोकरी मिळवण्याच्या प्रयत्नात आहे. परंतु, या स्पर्धेच्या युगात सरकारी नोकरी मिळणे फारच कठीण झाले आहे. सरकारी नोकरी मिळवण्याचे प्रत्येकाचे स्वप्न पूर्ण होत नाही. यामुळेच अनेकजण पात्रता असूनही खासगी नोकरी करताना दिसतात. दरम्यान, तुम्ही देखील सरकारी नोकरीच्या शोधात असाल तर आता तुमच्यासाठी एक गुड न्यूज आहे. नुकतीच मुंबई महापालिकेने कार्यकारी सहाय्यक (लिपिक) (Executive Assistant Clerical) पदासाठी भरती जाहीर केली आहे.
या भरतीसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत. अर्ज ऑफलाइन पद्धतीने करावा लागेल. मुंबई महानगरपालिका भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 22 सप्टेंबर 2023 आहे. भरतीसाठी आवश्यक असलेली शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, पगार आणि अर्जाची शेवटची तारीख याबद्दल तपशीलवार नोटिफिकेशनमध्ये दिली आहे.
या भरतीसाठी, उमेदवारांना ऑफलाइन अर्ज करावा लागेल. अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी अधिसूचना काळजीपूर्वक वाचावी. दिलेल्या तारखेनंतर व वेळेनंतर प्राप्त झालेले अर्ज विचारात घेतले जाणार नाहीत.
पदाचे नाव – कार्यकारी सहाय्यक (लिपिक)
एकूण पदांची संख्या – 3
शैक्षणिक पात्रता –
उमेदवार हा वाणिज्य शाखेतील पदवीधर किंवा मान्यताप्राप्त विद्यापीठातून समकक्ष असावा आणि पहिल्याच प्रयत्नात तो किमान ४५% गुणांसह उत्तीर्ण असावा.
तसेच उमेदवाराने महाराष्ट्र शासनाची इंग्रजी आणि मराठी टायपिंग चाचणी ३० शब्द प्रति मिनिट या वेगात उत्तीर्ण केलेली असावी.
Nitesh Rane : नितेश राणेंकडून पडळकरांची पाठराखण! म्हणाले, ‘संजय राऊत दादांवर..,’
नोकरीचे ठिकाण – मुंबई
अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाइन
अर्ज करण्याचा पत्ता –
शेठ व्ही.सी. गांधी आणि एम.ए. व्होरा महानगरपालिका सामान्य रुग्णालय, राजावाडी, घाटकोपर (पूर्व)
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 22 सप्टेंबर
निवड प्रक्रिया – मुलाखत
मुलाखतीची तारीख- 26 सप्टेंबर 2023
अधिकृत वेबसाइट – portal.mcgm.gov.in
जाहिरात-
https://drive.google.com/file/d/1Nl6lpaZz7xgeWbaploUa4NJF06T8xYtg/view