Nitesh Rane : नितेश राणेंकडून पडळकरांची पाठराखण! म्हणाले, ‘संजय राऊत दादांवर..,’

Nitesh Rane : नितेश राणेंकडून पडळकरांची पाठराखण! म्हणाले, ‘संजय राऊत दादांवर..,’

Nitesh Rane News : राज्यात सध्या भाजपचे आमदार गोपीचंद पडळकरांनी अजित पवारांवर केलेल्या विधानावरुन चांगलच घमासान सुरु आहे. एकीकडे राष्ट्रवादीच्या नेत्यांकडून गोपीचंद पडळकरांचा समाचार घेत असतानाच आता भाजपचे आमदार नितेश राणे(Nitesh Rane) यांनी गोपीचंद पडळकरांची(Gopichand Padalkar) बाजू घेत पाठराखण केल्याच दिसून येत आहे. यासोबतच अजितदादा महाविकास आघाडीत असताना संजय राऊत(Sanjay Raut) अग्रलेख लिहायचे ते कसं चालायचं? असा सवाल नितेश राणे यांनी उपस्थित केला आहे. यासंदर्भातील ट्विट राणे यांनी केलं आहे.

नितेश राणे ट्विटमध्ये म्हणाले, “मित्र पक्षांनी दादांवर टीका करणे म्हणजे दादांचा अपमान..मग महाविकास आगाडीमध्ये दादा असताना @rautsanjay61 ऊटसुट दादांवर टीका आणि दादांच्या विरोधात अग्रलेख लिहायचे ते कसे चालायचे ? त्यांना कोणाचा आशीर्वाद होता मग ? @GopichandP_MLC आणि संजय राजाराम राऊतला वेगळा न्याय का ? संजय राऊतला मुक्त सहमती होती का ?? असं ट्विट राणे यांनी केलं आहे.

अजितदादांना फडणवीसांचा सपोर्ट; ‘त्या’ वक्तव्यावरून पडळकरांना फटकारलं

काय म्हणाले होते पडळकर?
धनगर आरक्षणाचा मुद्दा सध्या राज्यात चांगलाच गाजत आहे, त्यावरुन मी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री यांना पत्र लिहुन मागणी केली असल्याचं पडळकर म्हणाले. त्यानंतर पत्रकारांनी पवारांना पत्र का नाही लिहिलं ते विचारताच पडळकर म्हणाले, अजित पवार लबाड लांडग्याचे लबाड पिल्लू असल्याची टीका केली होती. तर खासदार सुप्रिया सुळे यांचा उल्लेख लबाड लांडग्याची लेक म्हणून केला होता.

वाकचौरेंना पुन्हा शिवसेनेत घेण्याचं खापर मिलिंद नार्वेकरांवरच फोडलं; बबनराव घोलप यांचे गंभीर आरोप

देवेंद्र फडणवीस म्हणाले :
गोपीचंद पडळकरांच विधान अयोग्य आणि चुकीचंच असून महायुतीतल्या तिन्ही पक्षाच्या नेत्यांनी एकमेकांविषयी अशी विधाने करु नयेत, एकमेकांचा आदर करावा, असं फडणवीस म्हणाले होते.

Zareen Khan : बॉलिवूड अभिनेत्री जरीन खानच्या अडचणीत वाढ, अटक वॉरंट जारी, नेमकं प्रकरण तरी काय?

राधाकृष्ण विखे म्हणाले :
गोपीचंद पडळकरांच्या विधानानंतर राष्ट्रावादीच्या नेत्यांकडून पडळकरांसह भाजपच्या नेत्यांवर टीकेची तोफ डागण्यात येत आहे. भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी स्वत:वर आवर घालावा, या शब्दांत विखे पाटलांनी गोपीचंद पडळकरांचे कान टोचले आहेत.

दरम्यान, आता नितेश राणे यांनी गोपीचंद पडळकरांची बाजू घेत महाविकास आघाडीवरच प्रश्नांचा भडीमार केल्याने या वादात आता नितेश राणे यांनीही उडी घेतली आहे. त्यामुळे आता राष्ट्रवादीस महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून नेमकी काय प्रतिक्रिया दिली जातेयं? हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube