वाकचौरेंना पुन्हा शिवसेनेत घेण्याचं खापर मिलिंद नार्वेकरांवरच फोडलं; बबनराव घोलप यांचे गंभीर आरोप

वाकचौरेंना पुन्हा शिवसेनेत घेण्याचं खापर मिलिंद नार्वेकरांवरच फोडलं; बबनराव घोलप यांचे गंभीर आरोप

Babanrao Gholap On Milind Narvekar : उत्तर महाराष्ट्रातील कट्टर शिवसैनिक माजी मंत्री बबनराव घोलप (Babanrao Gholap) हे शिवसेना ठाकरे गटामध्ये नाराज असल्याची जोरदार चर्चा सुरु आहे. बबनराव घोलप हे शिर्डी लोकसभा मतदारसंघातील उमेदवारीवरुन नाराज असतानाच त्यांचे पुत्र माजी आमदार योगेश घोलप यांनी मुंबईमध्ये राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar)यांची भेट घेतली. त्यामुळे बबनराव घोलप हे राष्ट्रवादीमध्ये जाणार असल्याच्या चर्चाही सुरु झाल्या आहेत. या सर्व घडामोडींवर शिवसेना नेते बबनराव घोलप यांनी शिवसेना नेते मिलींद नार्वेकर यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. भाऊसाहेब वाकचौरे यांचा पुन्हा शिवसेनेत प्रवेश, या सर्व गोष्टी मिलींद नार्वेकर यांनीच घडवून आणल्याचा आरोपही केला आहे.

भीषण अपघात! कार आणि कंटेनरच्या धडकेत भाजपच्या नगरसेवकचा मृत्यू, राजकीय वर्तृळात शोककळा

बबनराव घोलप म्हणाले की, सगळं काही व्यवस्थित असताना हे अचानक का घडलं? हा मोठा संशोधनाचा भाग आहे. कारण मी काही मागितलं नव्हतं, आधीही सांगितलं होतं. मला स्वतः उद्धव ठाकरे यांनी बोलावून माझ्यावर जबाबदारी दिली होती की, तुम्ही शिर्डी मतदारसंघाची जबाबदारी सांभाळा, असंही सांगितलं होतं.

भीषण अपघात! कार आणि कंटेनरच्या धडकेत भाजपच्या नगरसेवकचा मृत्यू, राजकीय वर्तृळात शोककळा

त्याचवेळी हेही बोलणं झालं होतं की, मला एक अडचण आहे, ती दूर होईल अशी अपेक्षा आहे. कारण मी उच्च न्यायालयामध्ये लढत आहे. त्यामध्ये काही नाही झालं तर माझा मुलगा योगेश आहे. इथपर्यंतचं बोलणं झालं होतं. सगळं व्यवस्थित चाललं होतं. आपण त्या मतदारसंघात कामाला लागलो. त्या ठिकाणी कामाला लागल्यानंतर दोन दिवसांनी पुन्हा संपर्क प्रमुखपदाची जबाबदारी देण्यात आली. तेही काम आपण व्यवस्थित केलं.

तिथं जे काही पदाधिकारी होते, दहा-दहा, पंधरा-पंधरा वर्ष पदावर बसलेले होते. काम करत नव्हते. संघटनेचं काम बंद पडलं होतं. ते सुरळीत व्हावं, त्या दृष्टीने आणि आपला जो अनुभव आहे त्या दृष्टीने शाखा उद्घाटन करणे, जिल्हा परिषद, पंचायत समिती, मार्केट कमिटी या ज्या कार्यकर्त्यांच्या निवडणुका आहेत. त्याला वाव मिळाला पाहिजे असं माझं काम सुरु झालं.

बबनराव घोलप म्हणाले की, शिवसेनेने नगर जिल्ह्यात मार्केट कमिटी कधीच लढवली नाही. आता प्रत्येक मार्केट कमिटीमध्ये एक-एक, दोन-दोन सदस्य निवडून आलेले आहेत. त्याचबरोबर पंचायत समिती, जिल्हा परिषदा, महापालिका, नगरपालिका या ठिकाणी देखील कार्यकर्त्यांना निवडून आणण्याचा प्रयत्न करणार होतो. लोकसभा एवढंच माझं ध्येय नव्हतं. शिवसेना वाढली पाहिजे, शिवसेनेच्या कार्यकर्त्यांना लोकप्रतिनिधी होता आलं पाहिजे.त्यांना संधी मिळाली पाहिजे.

नगर जिल्ह्याचा इतिहास असा आहे की, त्या ठिकाणी सगळे संस्थानिक बसले आहेत. त्यांना सगळं आपल्या ताब्यात लागतं. मग आपण जिल्ह्यात गेल्यानंतर ज्या हालचाली सुरु केल्या त्यामुळे सर्वांना धक्काच बसला. त्या धक्क्यातूनच हे सगळं प्रकरण उद्भवलं असा आरोप शिवसेना नेते बबनराव घोलप यांनी केला आहे.

त्याचबरोबर शिवसेना ठाकरे गटाचे पदाधिकारी देखील त्या ठिकाणी विकल्या गेल्यासारखे होते. त्यामुळे त्यांना मी दूर केले. त्यानंतर पुढे साधारण वर्षभर व्यवस्थित चाललं. अचानक मिलींद नार्वेकरांनी पुढाकार घेतला आणि भाऊसाहेब वाकचौरे यांना प्रवेश दिला.

त्यानंतर जुन्या पदाधिकाऱ्यांना पदाधिकाऱ्यांना बोलावून घेतले. उद्धव ठाकरे यांचा दौरा लागला. त्या ठिकाणी भाऊसाहेब वाकचौरे यांच्या पुढे-पुढे करणे हे चित्र मला काही बरोबर दिसलं नाही. त्याचवेळी या सर्व घटनेला मिलींद नार्वेकर हेच जबाबदार असल्याचा आरोपही यावेळी बबनराव घोलप यांनी केला.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube