Jammu and Kashmir : पुन्हा एकदा जम्मू-काश्मीरमध्ये दहशवादी हल्ला झाला असल्याची माहिती समोर आली आहे. माहितीनुसार, दक्षिण काश्मीरमधील (Jammu and Kashmir) त्रालमध्ये (Tral) दहशतवाद्यांनी लष्कराच्या जवानावर हल्ला केला आहे. या हल्ल्यात जवान गंभीर जखमी झाले आहेत.
गोळी लागल्यानंतर जवानाला रुग्णालयात नेण्यात आले. सध्या माहितीनुसार, त्याच्यावर उपचार सुरू आहेत. तर दुसरीकडे जवानाला गोळी लागल्यानंतर लष्कराने परिसरात शोधमोहीम तीव्र केली असल्याचे सांगण्यात येत आहे. सध्या शोध मोहीम सुरू आहे.
#WATCH जम्मू-कश्मीर: पुलवामा के अवंतीपोरा के त्राल इलाके में आतंकियों ने सेना के एक जवान पर फायरिंग की। जवान छुट्टी पर था और घर आया हुआ था। उसके पैर में गोली लगी है और उसे तुरंत इलाज के लिए अस्पताल ले जाया गया। उसकी हालत स्थिर बताई जा रही है। इलाके को सुरक्षा बलों ने घेर लिया है:… pic.twitter.com/LYd1BeFI89
— ANI_HindiNews (@AHindinews) December 4, 2024
माहितीनुसार, टेरिटोरियल आर्मीचे मुश्ताक अहमद सोफी यांच्या पायात गोळी लागली आहे. त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. माहितीनुसार, सध्या त्यांची प्रकृती स्थिर आहे. तर दुसरीकडे गेल्या काही महिन्यांपासून जम्मू-काश्मीरमध्ये मोठ्या प्रमाणात दहशतवादी हल्ले होत आहे. बुधवारी दहशतवाद्यांनी जम्मू-काश्मीरमधील त्रालमधील लष्कराच्या चौकीला टार्गेट केले होते.
दहशतवाद्यांनी लष्कराच्या चौकीवर दोन ग्रेनेड गोळीबार केला, त्यातील एक स्फोट झाला. मात्र, या हल्ल्यात सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. दुसरा ग्रेनेड सुरक्षा दलांनी निष्फळ केला. या हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी दहशतवाद्यांचा शोध घेण्यासाठी शोधमोहीम सुरू केली.
लोकसभा निवडणुकीनंतर जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवादी घटनांमध्ये वाढ पाहायला मिळाली आहे. लोकसभा निवडणुकीनंतर दर महिन्याला दहशतवादी कोणत्या ना कोणत्या छोट्या-मोठ्या घटना घडवत आहेत.
टीम इंडिया WTC फायनल खेळणार का? एका क्लीकवर समजून घ्या संपूर्ण गणित
ऑक्टोबरमध्येच दहशतवाद्यांनी खोऱ्यातील बोगद्याच्या बांधकामात गुंतलेल्या कंपनीच्या कामगारांच्या तळावर हल्ला केला होता. ज्यामध्ये 6 स्थलांतरित कामगारांसह 7 जणांचा मृत्यू झाला. त्यानंतर दहशतवाद्यांनी आणखी एका परप्रांतीय मजुरावर हल्ला केला.