टीम इंडिया WTC फायनल खेळणार का? एका क्लीकवर समजून घ्या संपूर्ण गणित
World Test Championship 2025 : वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप 2023-25 मध्ये आत फक्त 15 कसोटी सामने उरले आहे. त्यामुळे यावेळी अंतिम सामना कोणत्या दोन संघात होणार याकडे क्रिकेट चाहत्यांचे लक्ष लागून आहे. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप 2023-25 च्या (World Test Championship 2025) अंतिम सामन्यासाठी भारत (India) , ऑस्ट्रेलिया (Australia) , दक्षिण आफ्रिका (South Africa) आणि श्रीलंका (Sri Lanka) यांच्यात शर्यत पाहायला मिळत आहे.
सध्या भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यात मालिका सुरु आहे तर , दक्षिण आफ्रिका विरुद्ध श्रीलंका यांच्यात देखील दोन सामन्यांची मालिका सुरु आहे. यानंतर ऑस्ट्रेलिया श्रीलंकेशी दोन सांमन्याची मालिका खेळणार आहे आणि दक्षिण आफ्रिका पाकिस्तानशी मालिका खेळणार आहे.
तर दुसरीकडे बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीच्या (Border-Gavaskar Trophy 2024) पहिल्या सामन्यात ऑस्ट्रेलियाविरुद्ध 295 धावांनी विजय मिळवल्याने 2025 वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनलसाठी पात्र होण्याच्या भारताच्या शक्यता वाढल्या आहेत. सध्या 2025 वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप पॉईंट्स टेबलमध्ये भारतीय संघ पहिल्या स्थानी तर ऑस्टेलिया तिसऱ्या स्थानी आहे. तर श्रीलंकेवर विजय मिळवल्याने दक्षिण आफ्रिका दुसऱ्या स्थानी आला आहे. बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीचा दुसरा कसोटी सामना 6 डिसेंबरपासून सुरु होणार आहे. त्यापूर्वी जाणून घ्या बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीच्या विविध संभाव्य निकालांच्या आधारे भारत वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलमध्ये कसा पोहोचू शकतो.
बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी 5-0, 4-1, 4-0 किंवा 3-0 ने जिंकल्यास लॉर्ड्सवर भारतीय संघाचे तिकीट निश्चित होईल. भारतीय संघ सलग तिसऱ्यांदा WTC फायनल खेळू शकतो.
बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी 3-1 ने जिंकून, भारतीय संघ WTC अंतिम फेरीसाठी तेव्हा पात्र ठरेल जेव्हा दक्षिण आफ्रिकेने दुसऱ्या कसोटीत श्रीलंकेचा पराभव केला नाही.
बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी 3-2 ने जिंकून, भारतीय संघ WTC अंतिम फेरीसाठी तेव्हा पात्र ठरेल जेव्हा श्रीलंकेने ऑस्ट्रेलियाविरुद्ध किमान एक सामना अनिर्णित ठेवला.
बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी 2-2 ने जिंकून, भारतीय संघ WTC अंतिम फेरीसाठी तेव्हा पात्र ठरेल जेव्हा दक्षिण आफ्रिकेने श्रीलंकेला 2-0 ने पराभूत केले आणि श्रीलंकेला ऑस्ट्रेलियाला 1-0 ने मालिकेत पराभव करावे लागेल.
Assam Beef Ban : मोठी बातमी! हॉटेल, रेस्टॉरंट आणि सार्वजनिक ठिकाणी गोमांस खाण्यावर बंदी
न्यूझीलंडचे समीकरण बिघडले
न्यूझीलंड आणि इंग्लंडचे तीन वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप पॉईंट्स कट झाल्याने न्यूझीलंड पॉईंट्स टेबलमध्ये चौथ्या वरून पाचव्या स्थानावर घसरला आहे. क्राइस्टचर्चमधील पहिल्या कसोटीत स्लो ओव्हर-रेट राखल्याबद्दल न्यूझीलंड आणि इंग्लंडचे सर्व खेळाडूंच्या मॅच फीच्या 15% दंड ठोठावण्यात आला आहे.