Jammu and Kashmir Terrorist Attack : आताची सर्वात मोठी बातमी समोर येत आहे. या बातमीनुसार, जम्मूत मोठा दहशतवादी हल्ला (Terrorist Attack) झाला आहे. या हल्ल्यात दहा यात्रेकरूंची हत्या करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, जम्मू-काश्मीरच्या रियासी जिल्ह्यात (Reasi district) रविवारी दहशतवाद्यांनी केलेल्या गोळीबारानंतर यात्रेकरूंनी भरलेली बस खोल दरीत कोसळली यामध्ये 10 जणांचा मृत्यू झाला आहे.
पोलीस अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, पोनी परिसरातील तेरायथ गावात श्री शिव खोडी मंदिरात (Shri Shiva Khodi Temple) जाणाऱ्या यात्रेकरूंच्या बसवर दहशतवादी हल्ला करण्यात आला आहे.
सध्या घटनास्थळी बचावकार्य सुरू करण्यात आले असून पोलीस, लष्कर आणि निमलष्करी दलाचे जवान घटनास्थळी पोहोचले आहेत अशी माहिती पोलीस अधिकाऱ्यांकडून देण्यात आली आहे.
Reasi bus accident | SSP Reasi Mohita Sharma says, "Initial reports suggest that terrorists fired upon the passenger bus going from Shiv Khori to Katra. Due to the firing, the bus driver lost balance of the bus and it fell into gorge. 33 people were injured in the incident.… pic.twitter.com/OHeASXuxrn
— ANI (@ANI) June 9, 2024
अपघातात 10 ठार तर 33 जखमी झाले आहेत
शिवखोडीहून कटरा येथे जाणाऱ्या प्रवासी बसवर दहशतवाद्यांनी गोळीबार केला. गोळीबारामुळे बस चालकाचे बसवरील नियंत्रण सुटले आणि बस खड्ड्यात पडली. या अपघातात 10 जणांचा मृत्यू झाला आहे तर 33 जण जखमी झाले आहेत.
NDA सरकार पण, मराठवाडा राहिला कोरडाच; कराडांना वगळलं, भुमरेंचीही पाटी कोरी..
मृतांमध्ये काही महिलांचाही समावेश आहे. प्रवाशांची ओळख अद्याप पटलेली नाही, ते स्थानिक नाहीत.अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. सध्या घटनास्थळी नागरिकांची गर्दी झाली आहे.
Nitin Gadkari Oath : नितीन गडकरींनी तिसऱ्यांदा घेतली मंत्रिपदाची शपथ