Download App

Thackeray Vs Shinde : मुख्यमंत्र्यांनी राजीनामा दिला राज्यपालांनी स्वीकारला; हरीश साळवे यांचा युक्तिवाद

  • Written By: Last Updated:

महाराष्ट्रातील सत्तासंघर्षांवर होळीच्या सुट्टींनंतर आजपासून सुप्रीम कोर्टात पुन्हा सुनावणी सुरु झाली आहे. या सत्तासंघर्षांवर ठाकरे गटाकडून युक्तिवाद पूर्ण झाला आहे तर आता शिंदे गटाकडून युक्तिवाद सुरु आहे. ठाकरे गटाकडून वरिष्ठ वकील कपिल सिब्बल, अभिषेक मनू सिंघवी यांनी बाजू मांडली आहे तर शिंदे गटाच्या वतीने हरीश साळवे, नीरज कौल, महेश जेठमलानी हे युक्तिवाद करत आहे.

आजच्या दिवसाची सुनावणी सुरु होताना शिंदे गटाचे वकील हरीश साळवे यांनी युक्तिवाद सुरु केला. राज्यपालाची भूमिका, अध्यक्षाचे अधिकार अशा मुद्द्यावर हरीश साळवे यांनी युक्तिवाद केला. आपल्या युक्तिवादामध्ये राज्यपालांचा निर्णय योग्यच होता. यासाठी युक्तिवाद करताना हरीश साळवे म्हणाले की, मुख्यमंत्र्यांनी राजीनामा दिला. राज्यपालांना स्वीकारावाच लागणार. राज्यपालांनी तो स्वीकारला. त्यानंतर दुसरी व्यक्ती आली आणि त्यांनी सांगितलं की आमच्याकडे बहुमत आहे. त्यांनी सरकार स्थापन केलं.

Live Blog | सत्तासंघर्षावर आजची सुनावणी संपली, दिवसभरात काय घडलं?

नवीन सरकार कायदेशीर पद्धतीने आलं की नाही यावर अजून निर्णय व्हायचा आहे. त्यामुळे राज्यपालांनी काहीही चुकीचं केलेलं नाही. या युक्तिवादामधून हरीश साळवे यांनी राज्यपालांचा निर्णय योग्य असल्याची बाजू मांडली आहे. याशिवाय एकदा राजीनामा दिल्यानंतर पुन्हा त्या व्यक्तीला सत्तास्थापनेसाठी बोलावता येत नाही.

सुप्रीम कोर्टात सलग दोन आठवडे सुनावणी झाल्यानंतर या आठवड्यात निकाल येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे सुप्रीम कोर्टात सुरु असलेल्या या सुनावणीकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागल आहे. कोर्टाकडून येणाऱ्या या निकालावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे यांचे राजकीय भवितव्य अवलंबून आहे. त्यामुळे राजकीयदृष्ट्या हा निर्णय अत्यंत महत्वाचा मानला जातो आहे.

Tags

follow us