Live Blog | सत्तासंघर्षावर आजची सुनावणी संपली, दिवसभरात काय घडलं?
महाराष्ट्रातील सत्तासंघर्षांवर होळीच्या सुट्टींनंतर आजपासून सुप्रीम कोर्टात पुन्हा सुनावणी सुरु झाली. सत्तासंघर्षां वरील सुनावणीमध्ये ठाकरे गटाकडून युक्तिवाद पूर्ण झाला आहे तर आता शिंदे गटाकडून युक्तिवाद सुरु आहे. ठाकरे गटाकडून वरिष्ठ वकील कपिल सिब्बल, अभिषेक मनू सिंघवी यांनी बाजू मांडली आहे तर शिंदे गटाच्या वतीने हरीश साळवे, नीरज कौल, महेश जेठमलानी यांनी युक्तिवाद केला.
सुप्रीम कोर्टात सलग दोन आठवडे सुनावणी झाल्यानंतर या आठवड्यात निकाल येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे सुप्रीम कोर्टात सुरु असलेल्या या सुनावणीकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागल आहे. कोर्टाकडून येणाऱ्या या निकालावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे यांचे राजकीय भवितव्य अवलंबून आहे. त्यामुळे राजकीयदृष्ट्या हा निर्णय अत्यंत महत्वाचा मानला जातो आहे.
सुप्रीम कोर्टातील युक्तिवादाचे संपूर्ण अपडेट पाहा एका क्लिकवर
LIVE NEWS & UPDATES
-
आजचा युक्तिवाद संपला
सत्तासंघर्षाच्या सुनावणीतील आजचा दिवस संपला आहे. आज शिंदे गटाचा युक्तिवाद पूर्ण झाला असून उद्या सकाळी पुन्हा सुनावणी सुरु होईल.
उद्या सकाळी पहिल्यांदा तुषार मेहता राज्यपालांची बाजू मांडतील आणि त्यानंतर ठाकरे गटाकडून रिजॉईन्डर केले जाईल.
ठाकरे गटाकडून कपिल सिब्बल आणि अभिषेक मनू सिंघवी पुन्हा युक्तिवाद करतील
-
जीवे मारण्याच्या धमक्या दिल्या गेल्या, तानाजी सावंत यांचं ऑफिस जाळलं गेलं
उद्धव ठाकरे गटाच्या नेंत्यानी जाहीर विधान केली की मुंबईतच येताना तुमची प्रेतं येतील, जीवे मारण्याच्या धमक्या दिल्या गेल्या, आमदार तानाजी सावंत यांचं ऑफिस जाळलं गेलं, असा युक्तिवाद शिंदे गटाकडून सुप्रीम कोर्टात आज केला गेला.
सविस्तर वाचा
जीवे मारण्याच्या धमक्या, तानाजी सावंत यांचं ऑफिस जाळलं गेलं; शिंदे गटाकडून युक्तिवाद
-
अपात्रतेचा निर्णय सभागृहातच हवा
महेश जेठमलानी म्हणाले की, “विधानसभेच्या उपाध्यक्षांविरोधात अविश्वास प्रस्ताव दाखल केल्यानंतर त्यांना कारवाईचा अधिकार राहत नाही. विधानसभा उपाध्यक्षांविरोधात अविश्वास प्रस्ताव दाखल केल्यानंतर त्यांनी स्वत:च त्यावर निर्णय घेणे, न्यायसंगत नाही. येथे अधिकारंचा गैरवापर होण्याची शक्यता आहे. यासोबत आमदारांच्या अपात्रतेचा निर्णय सभागृहातच व्हायला हवा.”
-
39 आमदारांना अपात्रतेची नोटीस नाही
ठाकरे गटाकडून 39 बंडखोर आमदारांपैकी फक्त 16 आमदारांनाच मुद्दाम अपात्रतेची नोटीस बजावण्यात आली. सर्व 39 आमदारांना अपात्रतेची नोटीस बजावण्यात आली नाही. बंडखोर आमदारांमध्ये फूट पाडण्यासाठीच केवळ 16 जणांना नोटीस बजावली. काही आमदारांनी परत यावे, या हेतूनेच केवळ 16 आमदारांना अपात्रतेची नोटीस बजावली.
CJ of Kenya Martha Koome rises, is escorted by the judges on the bench.
Jethmalani resumes after they return: Disqualification notice was only sent to 16 members, which reveals mala fide on his part. 16 would allow their govt to survive.#SupremeCourtofIndia #ShivSenaCrisis
— Live Law (@LiveLawIndia) March 14, 2023
-
जीवे मारण्याच्या धमक्या दिल्या गेल्या
ठाकरे गटाच्या नेंत्यानी जाहीर विधान केली की मुंबईतच येताना तुमची प्रेतं येतील, जीवे मारण्याच्या धमक्या दिल्या गेल्या, आमदार तानाजी सावंत यांचं ऑफिस जाळलं गेलं, असा युक्तिवाद शिंदे गटाकडून सुप्रीम कोर्टात आज केला गेला. शिंदे गटाचे वकील महेश जेठमलानी आपला युक्तिवाद करत आहेत. त्यावेळी त्यांनी हा मुद्दा मांडला. त्यावर केवळ मेरिटवर म्हणणे मांडा, असे निर्देश घटनापीठाने दिले.
Jethmalani about to read out death threats allegedly given to Eknath Shinde faction.
CJI: Not necessary for you to read these out.
Jethmalani: I'll summarise. (summarises) This is why we were compelled to approach Supreme Court.#SupremeCourtofIndia #ShivSenaCrisis
— Live Law (@LiveLawIndia) March 14, 2023
-
महेश जेठमलानी यांचा युक्तिवाद सुरु
ठाकरे गटाचे तिसरे वकील महेश जेठमलानी यांचा युक्तिवाद सुरु
नीरज कौल यांचा युक्तिवाद संपला
-
कौल यांचा युक्तिवाद संपला
कौल यांचा युक्तिवाद संपला
राज्यपाल त्यांच्या समोर आलेल्या माहितीवर निर्णय घेतात, त्यांच्याकडे निवडणूक आयोगाप्रमाणे तपासणी करायला यंत्रणा नसते
त्यांच्याकडे आलेल्या माहितीवरच त्यांनी निर्णय घेतला, यात चूक काय
उद्धव ठाकरे यांनी दहा मिनिटात राजीनामा दिला.
Kaul: Look at what they have argued...Thackeray's resignation to be set aside, governor ought not to have acted in constitutional capacity to invite largest party/coalition to form govt, a confidence motion, speaker's election to be reversed.#SupremeCourtofIndia #ShivSenaCrisis
— Live Law (@LiveLawIndia) March 14, 2023
-
तर राज्यपाल सभागृहात बहुमत चाचणी घ्यायला सांगू शकतात.
जर सरकारने बहुमत गमावलं असेल तर राज्यपाल सभागृहात बहुमत चाचणी घ्यायला सांगू शकतात.
राज्यपाल राजभवनात आमदारांची मोजणी करत नाहीत, ते सभागृहातच चाचणी करायला सांगतात.
नीरज कौल यांचा युक्तिवाद
Kaul: If a governor is satisfied that a govt has lost confidence of the house, it is the duty of the governor to call a floor test.#SupremeCourtofIndia #ShivSenaCrisis
— Live Law (@LiveLawIndia) March 14, 2023
-
हरीश साळवे यांचा युक्तिवाद काय?
आजच्या दिवसाची सुनावणी सुरु होताना शिंदे गटाचे वकील हरीश साळवे यांनी युक्तिवाद सुरु केला. राज्यपालाची भूमिका, अध्यक्षाचे अधिकार अशा मुद्द्यावर हरीश साळवे यांनी युक्तिवाद केला. आपल्या युक्तिवादामध्ये राज्यपालांचा निर्णय योग्यच होता. यासाठी युक्तिवाद करताना हरीश साळवे म्हणाले की, मुख्यमंत्र्यांनी राजीनामा दिला. राज्यपालांना स्वीकारावाच लागणार. राज्यपालांनी तो स्वीकारला.
-
नीरज कौल यांचा सर्वोच्च न्यायालयात सवाल
आज सर्वोच्च न्यायालय इतर सर्व घटनात्मक संस्थांना बाजूला सारून असं म्हणू शकतं का, की आम्ही या सर्व बाबींवर निर्णय घेणार?
नीरज कौल यांचा सर्वोच्च न्यायालयात सवाल
Kaul: …Today, can your lordships say that we will decide this? Taking away jurisdiction of all other coordinate and competent constitutional authorities. #SupremeCourtofIndia #ShivSenaCrisis
— Live Law (@LiveLawIndia) March 14, 2023
-
पक्ष कोणता हे ठरवण्याचा अधिकार निवडणूक आयोगाला
पक्ष कोणता हे ठरवण्याचा अधिकार निवडणूक आयोगाला
निवडणूक आयोगाकडे हे ठरवण्याचे अधिकार आणि यंत्रणा आहेत
विधानसभा अध्यक्ष त्यावर निर्णय घेऊ शकत नाही
नीरज कौल यांचा युक्तिवाद
Kaul: This court has said speaker will not embark on independent inquiry on split in the party, de hors disqualification. Wrt disqualification, only a prima facie view to be taken. They are asking speaker to usurp power which they don't have.#SupremeCourtofIndia #ShivSenaCrisis
— Live Law (@LiveLawIndia) March 14, 2023
-
विधिमंडळ गट आणि राजकीय पक्ष, शिंदे गटाचा युक्तिवाद
विधिमंडळ गट आणि राजकीय पक्ष एकमेकांशी संबंधितच असतात.
दोन्ही एकमेकांवर अवलंबून आहेत.
शिंदे गटाचे वकील नीरज कौल यांचा युक्तिवाद
-
नीरज कौल यांचा युक्तिवाद सुरु
हरीश साळवे यांचा युक्तिवाद संपला
शिंदे गटाचे दुसरे वकील नीरज कौल यांचा युक्तिवाद सुरु
-
मुख्यमंत्र्यांनी राजीनामा दिला. राज्यपालांना स्वीकारावाच लागणार.
मुख्यमंत्र्यांनी राजीनामा दिला. राज्यपालांना स्वीकारावाच लागणार.
दुसरी व्यक्ती आली आणि त्यांनी सांगितलं की आमच्याकडे बहुमत आहे. त्यांनी सरकार स्थापन केलं.
नवीन सरकार कायदेशीर पद्धतीने आलं की नाही यावर अजून निर्णय व्हायचा आहे. त्यामुळे राज्यपालांनी काहीही चुकीचं केलेलं नाही.
हरीश साळवे यांचा युक्तिवाद
-
एकदा राजीनामा दिल्यानंतर पुन्हा त्या व्यक्तीला सत्तास्थापनेसाठी बोलावता येत नाही.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राजीनामा दिला होता. त्यामुळे राज्यपालांनी नव्या नेत्याला सत्ता स्थापनेसाठी बोलावलं.
एकदा राजीनामा दिल्यानंतर पुन्हा त्या व्यक्तीला सत्तास्थापनेसाठी बोलावता येत नाही.
शिंदे गटाचे वकील हरीश साळवे यांचा युक्तिवाद
Salve: Everything cannot be scrambled like this just by approaching #SupremeCourt. This court cannot issue direct a CM who has resigned to come back...Whenever there is a question, governor must call for a vote of confidence, nothing wrong.#SupremeCourtofIndia #ShivSenaCrisis
— Live Law (@LiveLawIndia) March 14, 2023
-
सभागृहात बहुमत सिद्ध होणे हे लोकशाहीसाठी महत्वाच आहे.
सभागृहात बहुमत सिद्ध होणे हे लोकशाहीसाठी महत्वाच आहे.
राज्यपालांनी बहुमत चाचणी बोलावली, हे बरोबरच आहे. यासाठी कर्नाटकातील बोंबई केसचा दाखला
Salve: Your Lordships have said that let democracy play out on the floor of the house. That is the position laid down in SR Bommai. Governor did nothing wrong by calling the floor test. As far as the Nabam Rebia, it might need to be relooked.#SupremeCourtofIndia #ShivSenaCrisis
— Live Law (@LiveLawIndia) March 14, 2023
-
किहोटो केसवर देखील कदाचित पुनर्विचार करण्याची गरज
किहोटो केसवर देखील कदाचित पुनर्विचार करण्याची गरज, हरीश साळवे यांचा युक्तिवाद
किहोटो निकाल हा कायदा विरोधी बनला आहे का?
Salve: There was a provision for a split, which has now been deleted. Sizeable number...Kihoto might need relook, has this law become anti-dissent?
CJI: What is a sizeable number?
Salve: Not for the court to decide.#SupremeCourtofIndia #ShivSenaCrisis
— Live Law (@LiveLawIndia) March 14, 2023
-
हरीश साळवे यांचा युक्तिवाद सुरु
विधानसभा अध्यक्षांची भूमिका काय, यावर हरीश साळवे यांचा युक्तिवाद सुरु.
विधानसभा अध्यक्षांनी कोणत्या वेळी काय भूमिका घेतली पाहिजे, हे सांगणे अवघड आहे. पण विधानसभा अध्यक्षांनी आपले स्थान गमावले होते.
त्यामुळे ते सोळा आमदारांना ते अपात्र ठरवू शकतात.
-
शिंदे गटाचा युक्तिवाद सुरु
आजच्या सुनावणीसाठीचा शिंदे गटाकडून युक्तिवाद सुरु केला आहे. शिंदे गटाकडून जेष्ठ वकील हरीश साळवे यांचा युक्तिवाद सुरु केला आहे
-
मागील आठवड्यात काय युक्तिवाद झाला?
पक्षांतर्गत लोकशाही हाच आमचा मुद्दा
मागील सुनावणी दरम्यान ठाकरे गटाचे वकील नीरज कौल यांनी युक्तिवाद सुरु केला. आपल्या युक्तिवादामध्ये कौल यांनी “पक्षांतर्गत लोकशाही हाच आमचा मुद्दा आहे. आमची केस त्यावरच आधारीत आहे. त्यामुळे आम्ही दहाव्या अनुसूचीत बसत नाही.” असा युक्तिवाद केला.
सुनावणीचा शेवटचा दिवस असताना शिंदे गटाच्या वतीने हरीश साळवे यांची सरप्राईज एन्ट्री झाली. साळवे यांनी थेट लंडनमधून ऑनलाईन पद्धतीने युक्तिवादात सहभागी झाले. हरीश साळवे यांचा युक्तिवाद आधीच्या वेळापत्रकात नव्हता. त्यामुळे आज दिवसभर सुनावणी होईल असं वाटतं असताना फक्त दोन तासात कोर्टाचे कामकाज संपवले कारण साळवे यांच्या एंट्रीमूळे दिवसभरामध्ये सुनावणी पूर्ण होऊ शकत नव्हती.
तर “उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिल्यानंतरच सरकार कोसळले. मगच राज्यपालांनी फ्लोअर टेस्ट घ्यायला सांगितले. ठाकरेंनी फ्लोअर टेस्ट ला सामोरं जायला पाहीजे होतं. जर फ्लोअर टेस्टला सामोरे गेले असते तर काय झालं असतं.” असा युक्तिवाद शिंदे गटाचे दुसरे वकील ॲड हरीश साळवे यांनी केला.
