Download App

मध्य प्रदेशात ११ घरांवर बुलडोझर कारवाई; फ्रिजमध्ये बीफ ठेवल्याचा आरोप, एकाला अटक

गाय तस्करीविरोधातील मोहिमेत घरांमध्ये जवळपास १०० जनावरं, मोठ्या प्रमाणावर बीफ आणि १५० गायी सापडल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे.

  • Written By: Last Updated:
Image Credit: Letsupp

Beef News : घरांमध्ये मोठ्या प्रमाणावर बीफ, गायी यांच्यासह जनावरांचे अवशेष आणि हाडं सापडल्याचं सांगत मध्य प्रदेशात गाय तस्करीविरोधातील मोहिमेचा भाग म्हणून प्रशासनाने ११ घरांवर बुलडोझर फिरवलं आहे. (Beef) येथील आदिवासीबहुल जिल्हा असणाऱ्या मांडलाच्या नैनपूर परिसरात ही कारवाई करण्यात आली. (Ncert) तसंच, घरांवर कारवाई करण्यापूर्वी संबंधितांना नोटसा पाठवण्यात आल्या होत्या. त्यामुळे त्यांच्याकडे नोटीसला उत्तर देण्यासाठी पुरेसा वेळ होता, असा दावाही प्रशासनाकडून करण्यात आला आहे.

एकाला अटक दुर्गाडी किल्ल्यावर मुस्लीम बांधवांची नमाज; शिवसेना शिंदे गट-ठाकरे गटाचे घंटानाद आंदोलन

पोलीस प्रशासनाच्या म्हणण्याप्रमाणे ही सगळी घरं सरकारी भूखंडावर होती. याप्रकरणी पोलिसांनी 11 लोकांविरोधात गुन्हे दाखल केले आहेत. शनिवारी संध्याकाळी नैनपूरमधील भैन्सवाही गावात ही घटना घडली. या घरांवर छापा टाकणाऱ्या पोलीस पथकाने 11 आरोपींपैकी एकाला अटकही केली आहे. वाहिद कुरेशी असं या आरोपीचं नाव असून त्याची न्यायालयीन कोठडीत रवानही करण्यात आली आहे. आरोपींपैकी ५ ते ६ आरोपींचा याआधीही गाय तस्करी प्रकरणात सहभाग आढळून आल्याचं पोलिसांचं म्हणणं आहे.

घरांना नोटिसाही पाठवल्या होत्या

हा १५००० चौरस फुटांचा भूखंड चराई क्षेत्र म्हणून स्थानिक प्रशासनाने जाहीर केला होता. त्यावर ही घरं बांदण्यात आली होती. काही दिवसांपूर्वी स्थानिक प्रशासनाने या अतिक्रमणासंदर्भात या घरांना नोटिसाही पाठवल्या होत्या. त्यामुळे आदेश मिळाल्यानंतर स्थानिक प्रशासनाने या घरांवर कारवाई केली अशी माहिती मांडलाचे पोलीस अधीक्षक रजत सकलेचा यांनी दिली.

150 गायीदेखील ताब्यात

या गावात याआधीही गाय तस्करीची 5 ते 6 प्रकरणं समोर आली होती. त्यामुळे पोलिसांची गस्त वाढवण्यात आली होती. यावेळी आम्हाला माहिती मिळताच तीन पथकांसह आम्ही कारवाई केली. येथे टाकलेल्या छाप्यात या घरांमधील फ्रीजमधून बीफ ताब्यात घेण्यात आलं आहे. त्याशिवाय जवळपास 100 जनावरं, जनावरांची हाडं तिथे सापडली. त्याशिवाय जवळपास 150 गायीदेखील ताब्यात घेण्यात आल्या आहेत असंही सकलेचा म्हणाले आहेत.

गाय तस्करीचं रॅकेट Pakistan vs Ireland: आयर्लंडवर पाकिस्तानचा 3 गडी राखून दणदणीत विजय

मध्य प्रदेशातील मांडला ते जबलपूर या भागात हे गाय तस्करीचं रॅकेट असल्याचं पोलिसांनी सांगितलं. “या प्रकरणातील मुख्य आरोपीचा एक नातेवाईक मोठा व्यावसायिक असून तो जबलपूरला राहतो. जनावरांची हाडं सप्लिमेंट तयार करण्यासाठी वापरण्यात येणार होती, तर त्यातलं मांस इतर उत्पादनांसाठी वापरलं जाणार होतं”, अशी माहिती एका वरीष्ठ अधिकाऱ्यानं दिली आहे.

Tags

follow us

वेब स्टोरीज