Murder of Chandrasekhar Janardhana Rao : वेलनज ग्रुप ऑफ इंडिस्ट्रिजचे ते संस्थापक अब्जाधीश उद्योगपती वेलामाती चंद्रशेखर जनार्दन राव यांची त्यांच्या नातवाने निर्घृण हत्या केल्याची घटना समोर आली आहे. (Murder) तेलंगनाची राजधानी हैदराबादमध्ये ही घटना घडलीय. वेलामाती यांची त्यांच्याच २९ वर्षीय नातवाने हत्या केली. किलारू कीर्ति तेजा असं नातवाचं नाव आहे. सोमाजीगुडा इथं वेलामाती यांच्यावर नातू किलारूने ७० वेळा चाकूने वार केला.
रिपोर्ट्सनुसार, संपत्तीच्या वाटणीवरून झालेल्या वादानंतर ही हत्या झालीय. तेजाने आजोबांवर संपत्तीची वाटणी नीट न केल्याचा आरोप करत विरोध केला होता. यानंतर दोघांमध्ये वाद वाढला. शेवटी रागाच्या भरात वेलामाती राव यांच्यावर नातू किलारूने तब्बल ७० वार केले.
मुख्यमंत्री फडणवीस अचानक राज ठाकरेंच्या भेटीला, ‘शिवतीर्थ’वर नेमकी कोणती खलबतं सुरू?
संपत्तीवरून वाद सुरू असताना तेजाची आई आणि राव यांची मुलगी सरोजनी देवी यांनी हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न केला. मात्र तेजाने आईचं ऐकलं नाही. सरोजनी देवी यासुद्धा जखमी झाल्या आहेत. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तेजा नुकताच अमेरिकेतून त्याचं उच्चशिक्षण पूर्ण करून हैदराबादला परतला होता.
तेजा आणि त्याची आई वेगवेगळे राहत होते. पण हल्ल्याच्या आधी दोघेही वेलामाती राव यांच्या निवासस्थानी होते. हल्ल्यानंतर तेजावर हत्येचा गुन्हा दाखल केला असून त्याला ताब्यात घेण्यात आलंय. पोलीस या प्रकरणी अधिक तपास करत आहेत. जनार्दन राव हे एक प्रसिद्ध उद्दोयगपती होते. त्यांचं शिप बिल्डिंग, एनर्जी आणि इंडस्ट्रियल अॅप्लिकेशनसह अनेक क्षेत्रात मोठं योगदान होतं.