Download App

शेतकऱ्यांची दिवाळी होणार गोड! सरकारने गहू-हरभऱ्यासह 6 रब्बी पिकांचा वाढवला एमएसपी

  • Written By: Last Updated:

Rabi Crops MSP Hike : हवामानाचा लहरीपणा, नापिकी, शेतकऱ्याला पिकांना मिळणार अल्प दर या सगळ्यामुळं शेतकऱ्यांच्या डोक्यावर कर्जाचा डोंगर वाढत आहे. दरम्यान, मोदी सरकारने (Modi Govt) दिवाळीपूर्वी देशातील शेतकऱ्यांना मोठी भेट दिली आहे. सरकारने 6 रब्बी पिकांसाठी एमएसपी (MSP) म्हणजेच किमान आधारभूत किंमत वाढवली आहे. मंत्रिमंडळाने एमएसपी 2% वरून 7% पर्यंत वाढवण्यास मंजुरी दिली आहे. या निर्णयाला सरकारने मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता दिली.

PM Modi येणार शिर्डी दौऱ्यावर, लोकसभेच्या गणितांवर खलबतं होणार? 

केंद्रीय मंत्रिमंडळाने बुधवारी हंगाम 2024-25 साठी रब्बी पिकांच्या हमी भावात वाढ करण्यास मंजुरी दिली. हरभरा हे राज्यातील रब्बी हंगामातील मुख्य पीक आहे. देशात डाळींचा तुटवडा असल्याने गेल्या काही आठवड्यांत हरभऱ्याच्या दरात वाढ झाली आहे. तसेच देशातील दुष्काळी परिस्थिती आणि डाळींचा तुटवडा लक्षात घेऊन सरकारने डाळींचे उत्पादन वाढविण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. त्यामुळे केंद्र सरकार या हंगामात हरभऱ्याच्या हमी भावात कितीने वाढ करते, याकडे सर्वांच लक्ष लागलं होतं. दरम्यान, हरभऱ्याच्या एमएसपीमध्ये प्रति क्विंटल 105 रुपयांची वाढ करण्यात आली आहे.

गहू आणि हरभऱ्यासह अन्य 6 पिकांच्या एमएसपीमध्ये वाढ करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. गव्हाची किमान आधारभूत किंमत 150 रुपये प्रति क्विंटल निश्चित करण्यात आली आहे. याशिवाय मोहरीची किमान आधारभूत किंमत 400 रुपये करण्यात आली आहे.

केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी या निर्णयाबद्दल माहिती देतांना सांगितलं की, शेतकऱ्यांचं उत्पन्न दीड पटीने वाढणार आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत मसूरच्या एमएसपीमध्ये प्रति क्विंटल 425 रुपयांनी वाढ करण्यात आली आहे. त्यामुळं मसूरचा हमीभाव आता 6 हजार 425 रुपयांवर पोहोचला.

तर गव्हाच्या एमएसपीमध्ये प्रति क्विंटल 150 रुपयांची वाढ झाली आहे. हरभऱ्याच्या एमएसपीमध्ये प्रति क्विंटल 105 रुपयांची वाढ करण्यात आली आहे. म्हणजे, यंदाच्या रब्बीत हरभऱ्याला 5 हजार 440 रुपये हमीभाव असेल.

करडई (सुर्यफुल) पिकाच्या एमएसपीमध्ये प्रति क्विंटल 150 रुपयांची वाढ झाली आहे. बार्लीची एमएसपी प्रति क्विंटल 115 रुपयांनी वाढली. तर तेलबिया आणि मोहरीच्या एमएसपीमध्ये प्रति क्विंटल 200 रुपयांची वाढ झाली आहे.

Tags

follow us