Download App

जम्मूमध्ये भाजपचं तर काश्मीर खोऱ्यात ओमर अब्दुल्लां वर्चस्व; एक्झिट पोलमध्ये कुणाला किती जागा?

18 सप्टेंबरला पहिल्या टप्प्यात आणि 25 सप्टेंबरला दुसऱ्या टप्प्याचं मतदान झालं होतं. कलम 370 हटवल्यानंतर येथे पहिल्यांदाच निवडणुका झाल्या आहेत.

  • Written By: Last Updated:

Jammu and Kashmir Exit Poll : जम्मू आणि काश्मीर विधानसभा निवडणुकीनंतर आता मतदार (Jammu Kashmir) निकालाची वाट पाहत आहेत. यावेळी जम्मू-काश्मीरमध्ये तीन टप्प्यात विधानसभा निवडणुका झाल्या. (Exit Poll ) 1 ऑक्टोबर रोजी विधानसभेच्या 90 जागांवर शेवटच्या टप्प्यातील मतदान पार पडलं.

याआधी 18 सप्टेंबरला पहिल्या टप्प्यात आणि 25 सप्टेंबरला दुसऱ्या टप्प्याचं मतदान झालं होतं. कलम 370 हटवल्यानंतर येथे पहिल्यांदाच निवडणुका झाल्या आहेत. जम्मू-काश्मीरमध्ये 10 वर्षांनंतर विधानसभा निवडणुकीसाठी मतदान झालं, त्यामुळे मतदारांच्या नजरा निकालाकडे लागल्या आहेत.

Haryana Exit Poll मध्ये भाजपला मोठा धक्का, हरियाणात 10 वर्षांनंतर काँग्रेस सरकार

जम्मू आणि काश्मीर विधानसभा निवडणुकीचे एक्झिट पोल आता समोर येत आहेत. या सर्वेक्षणानुसार काँग्रेस आणि नॅशनल कॉन्फरन्स आघाडीला (इंडिया ब्लॉक) मोठी आघाडी मिळताना दिसत आहे. गेल्या निवडणुकीत (2014) या आघाडीला 24 जागा मिळाल्या होत्या, यावेळी एक्झिट पोलमध्ये 40 ते 48 जागा मिळण्याची शक्यता आहे. गेल्या निवडणुकीच्या तुलनेत ही सुमारे 18 ते 22 जागांची वाढ आहे.

तर दुसरीकडे भारतीय जनता पक्षाची (भाजप) स्थितीही स्थिर दिसत आहे. गेल्या निवडणुकीतील २५ जागांच्या तुलनेत यावेळी त्यांना २७-३२ जागा मिळू शकतात, म्हणजेच भाजपला २ ते ४ जागा वाढू शकतात. पीडीपीचे सर्वाधिक नुकसान होत आहे. गेल्या वेळी 28 जागा जिंकणाऱ्या पीडीपीला यावेळी केवळ 6 ते 12 जागा मिळण्याची शक्यता आहे, म्हणजेच जवळपास 16-22 जागांचे मोठं नुकसान होऊ शकतं. इतर पक्षांबद्दल बोलायचं झालं तर त्यांना 6 ते 8 जागा मिळण्याची अपेक्षा आहे, जी गेल्या निवडणुकीच्या तुलनेत सुमारे 2 जागांनी वाढली आहे.

follow us