पुढील दोन तीन दिवसांत मुसळधार पाऊस, हवामान विभागाचा तब्बल 23 जिल्ह्यांना अलर्ट

भारतीय हवामान विभागाकडून तब्बल 23 जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

News Photo   2026 07 19T183223.738

पुढील दोन तीन दिवसांत मुसळधार पाऊस, हवामान विभागाचा तब्बल 23 जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा इशारा

मान्सून भारतामध्ये आता पूर्णपणे सक्रिय झाला आहे. (Rain) या पार्श्वभूमीवर अनेक राज्यांमध्ये अति मुसळधार पावसाचा इशारा भारतीय हवामान विभागाकडून देण्यात आला आहे. काही राज्यात तर अतिवृष्टीची शक्यता आहे. भारतीय हवामान विभागाकडून सातत्याने या निर्माण झालेल्या परिस्थितीचा आढावा घेतला जात आहे.

इस्त्रोच्या सॅटेलाईटने जारी केलेल्या नव्या फोटोंमुळे मोठी खळबळ उडाली आहे. भारताचा जवळपास 60 ते 70 टक्के भाग मान्सूनच्या ढगांनी व्यापून टाकला आहे. याचाच अर्थ पुढील दोन ते तीन दिवसांमध्ये देशातील जवळपास दोन तृतियांश भागांमध्ये अति मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. पंजाब, उत्तर प्रदेश, बिहार या राज्यांमध्ये अतिवृष्टीची शक्यता आहे.

धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा ही शुल्लक गोष्ट, वांगचुक यांच्या समर्थनात ठाकरे मैदानात, केली मोठी घोषणा

हवामान तज्ज्ञाच्या मते गेल्या काही वर्षांपासून वातावरणात मोठा बदल होत आहे. कधी-कधी अतिमुसळधार पाऊस होतो तर कधी-कधी दुष्काळासारखी परिस्थिती निर्माण होते. त्यामुळे नागरिकांनी हवामान बदलाच्या पार्श्वभूमीवर हवामान विभागाकडून देण्यात येणाऱ्या सूचनांचं पालन करावं, असं देखील नागरिकांना आवाहन करण्यात आलं आहे.

महाराष्ट्रात पावसाने पुन्हा एकदा जोरदार पुनरागमन केलं आहे. भारतीय हवामान विभागाकडून तब्बल 23 जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. मध्य महाराष्ट्र, कोकण आणि मराठवाड्यामध्ये पावसाचा जोर वाढणार आहे. पुणे, नाशिक, परभणी, जालना, बीड, नांदेड, हिंगोली, सोलापूर, लातूर, अमरावती, गडचिरोली, धाराशिव, बुलढाणा, चंद्रपूर, नागपूर या जिल्ह्यांसह अनेक जिल्ह्यांना आज पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला

Exit mobile version