धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा ही शुल्लक गोष्ट…, वांगचुक यांच्या समर्थनात ठाकरे मैदानात, केली मोठी घोषणा

उद्धव ठाकरे यांनी सोनम वांगचूक यांच्या आंदोलनला जाहीर पाठिंबा दिला. तसंच त्यांनी भाजपा आणि केंद्रातील नरेंद्र मोदी यांच्या सरकारला लक्ष्य केलं.

News Photo   2026 07 19T173346.793

दिल्लीमध्ये सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचूक (Sonam) यांचे अन्नत्याग आंदोलन सुरू आहे. त्यांना दिल्लीच्या रुग्णालयात सध्या दाखल करण्यात आलं आहे. दिल्लीच्या आंदोलनस्थळी आता कॉकरोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजित दीपके हे अन्नत्याग आंदोलनाला बसले आहेत. त्यांना पाठिंबा देण्यासाठी मुंबईतही माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आंदोलनाचे आयोजन केलं होतं. या आंदोलनात लोकांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला.

यावेळी उद्धव ठाकरे यांनी सोनम वांगचूक यांच्या आंदोलनला जाहीर पाठिंबा दिला. तसंच त्यांनी भाजपा आणि केंद्रातील नरेंद्र मोदी यांच्या सरकारला लक्ष्य केलं. हे सरकार आता घालवलं पाहिजे, असंही यावेळी ते म्हणाले. मुंबईत आझाद मैदानात आयोजित केलेल्या या आंदोनलाला ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे, खासदार संजय राऊत, ठाकरे यांच्या शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे तसेच अन्य महत्त्वाचे नेते उपस्थित होते.

ही दुसरी स्वातंत्र्य चळवळ, संसदेवरील मोर्चा होणारच! रुग्णालयातून सोनम वांगचुक यांचा संदेश

आंदोलनस्थळी सोनम वांगचूक, अभिजित दीपके यांच्या समर्थनार्थ घोषणा देण्यात आल्या. तसेच यावेळी ठाकरे यांनी आपल्या भाषणात मोदी सरकारवर सडकून टीका केली. आता एक पोस्टर होतं. धर्मेंद्र प्रधान राजीनामा द्या. ही शुल्लक गोष्ट आहे. हे पण एकदम शुल्लक आहे. हा लढा आता हे सरकार आपल्याला रोजी रोटी देऊ शकत नाही, रोजगार शिक्षण देत नाही. उत्तर देत नाही. हे सरकार बदलण्याचा लढा सुरू झाला पाहिजे असंही ते म्हणाले.

त्याचबरोबर धर्मेंद्र प्रधान नको. सरकारच बदलायचं आहे. मी नेतृत्व करायला आलो नाही. नेते व्हा सांगायला आलो आहे. एकच वचन द्या, ही आग सरकार बदलेपर्यंत टिकली पाहिजे. सरकार टिकता कामा नये, या आगीत सरकार भस्म झालं पाहिजे. हा लढा फक्त वांगचुक यांचा नाही. केवळ चंदा चोरी वोट चोरी आणि तुमचं भवितव्य चोरणारं हे सरकार आहे. काय दिलं या सरकारने?

follow us