Download App

Vinesh Phogat: नखं कापली केस कापली अन् रक्तसुद्धा काढलं; मात्र, वजन प्रकारात विनेशची हार

नखे कापली केस अन् रक्तसुद्धा काढलं; अनेक प्रयत्न करूनही वजन प्रकारात विनेश फोगाटची हार झाली. त्यामुळे हा भारताला मोठा धक्का आहे.

  • Written By: Last Updated:

Paris Olympics 2024 : भारताची कुस्तीपटू विनेश फोगटला पॅरिस ऑलिम्पिकसाठी अपात्र ठरल आहे. (Paris Olympics) काल रात्री ५० किलो गटाच्या अंतिम फेरीत पोहोचलेल्या विनेश फोगटचे वजन निर्धारित वजन मर्यादेपेक्षा जास्त असल्याचं आढळून आलं त्यानंतर तिला स्पर्धेतून अपात्र ठरवण्यात आलं आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मंगळवारी रात्री विनेश फोगटचे वजन 2 किलो जास्त होते आणि तिने ते कमी करण्यासाठी खूप मेहनत घेतली. रिपोर्ट्सनुसार, जेव्हा तिने सेमीफायनल मॅच जिंकली तेव्हा तिचं वजन सुमारे 52 किलो होते आणि नंतर तिचं वजन 2 किलोने कमी करण्यासाठी तिने तिचं रक्त देखील काढलं.

Mohammad Yunus: बांगलादेशात अंतरिम सरकार स्थापन, अर्थतज्ज्ञ मोहम्मद युनूस नेतृत्व करणार

रक्त काढलं

विनेश फोगटने सेमीफायनल जिंकल्यानंतर आराम केला नाही. तिने रात्रभर जागून तिचे अतिरिक्त वजन कमी करण्याचा खूप प्रयत्न केला. स्पोर्ट्स स्टारच्या रिपोर्टनुसार, विनेश फोगटने वजन कमी करण्यासाठी सायकल चालवली, तिने स्किपिंग केलं. एवढंच नाही तर या खेळाडूने आपले केस आणि नखेही कापले. मोठी गोष्ट म्हणजे या खेळाडूने तिचे रक्तही काढले पण असे असूनही ती केवळ 50 किलो, 150 ग्रॅमपर्यंत पोहोचू शकली.

विनेश फोगाट प्रकरणाचे संसदेत पडसाद; विरोधकांचा लोकसभेत जोरदार गदारोळ

खूप प्रयत्न केले

कुस्तीमध्ये, कोणत्याही कुस्तीपटूला फक्त 100 ग्रॅम जास्त वजनाचा भत्ता मिळतो. म्हणजे, विनेशचे वजन ५० किलो किंवा १०० ग्रॅम असते तर ती सुवर्णपदकाची लढत खेळू शकली असती, पण तिचे वजन ५० ग्रॅम जास्त होते आणि त्यामुळे तिचे ऑलिम्पिक पदक जिंकण्याचं स्वप्न भंगलं. कुस्तीमध्ये कुस्तीच्या सामन्यांपूर्वी पैलवानांचे वजन केलं जाते. याशिवाय कुस्तीपटूला त्याच श्रेणीत आपलं वजन 2 दिवस राखायचं आहे परंतु विनेशला तसे करता आले नाही. रिपोर्ट्सनुसार, तीचं वजन 52 किलोपर्यंत पोहोचलं होतं, तीने ते कमी करण्याचा खूप प्रयत्न केला पण शेवटी तो अपयशी ठरला.

follow us