PM Modi in Lok Sabha on Pahalgam Attack : लोकसभेत सुरू असलेल्या पहलगाम (Attack) हल्ल्यावरील चर्चेला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उत्तर दिले. याआधी पाकिस्तानशी आपली अनेक युद्धे झालेली आहे. पण ही पहिली अशी लढाई होती, त्यात अशी रणनीती बनली की, ज्यात पूर्वी जिथे कधीच गेलो नाही तिथे आपण गेलो असा दावाच त्यांनी यावेळी केला आहे.
पहलगाममध्ये पाकिस्तानी अतिरेक्यांनी धर्म विचारुन अगदी क्रुरपणे निष्पापांना ठार केले, त्यामुळे देशात दंगली देखील होऊ शकल्या असत्या. परंतू देशवासियांनी धैर्य राखले त्याबद्दल मी त्यांचा ऋणी आहे असेही पंतप्रधान नरेंद्र मोदी यावेळी म्हणाले. आपण ऑपरेशन सिंदूर अंतर्गत पाकिस्तानाच्या कोनाकोपऱ्यातले दहशतवादी अड्डे तोडले. दहशतवाद्यांनाही वाटलं नसेल तिथे कोणी येईल. बहावलपूर आणि मुरिकदेलाही आपल्या सैन्याने जमीनदोस्त केले. आपल्या सैन्याने दहशतवादी अड्डे जमीनदोस्त केल्याचे पंतप्रधान यांनी यावेळी सांगितले.
सैनिक म्हणजे टायगरला तुम्ही बांधू शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरून राहुल गांधींचा सरकारवर वार
आमच्यावर एवढा मोठा हल्ला होईल, असा पाकिस्तानने कधीच विचार केला नव्हता. तेव्हा पाकिस्तानने भारताच्या डीजीएमओला फोन करून विनंती केली होती. हे बंद करा. बरंच मारलं. आता अधिक मार खाण्याची आमच्यात ताकद नाही. प्लीज हल्ला रोखा, असं पाकिस्तानचा डीजीएमएकडून आम्हाला विनंती करण्यात आली, असे मोदींनी संसदेत सांगितले.
तसंच, भारताने ऑपरेशन सिंदूर राबवलं तेव्हाच सांगितलं होतं की आम्ही आमचं लक्ष्य पूर्ण केलं आहे. परत असं कराल तर महागात पडेल. आमची अॅक्सन नॉन एक्सेलेटरी आहे, हे आम्ही आधीच सांगितलं होतं. त्यामुळेच आम्ही हा हल्ला रोखला. जगातील कोणत्याही नेत्याने भारताचं ऑपरेशन रोखण्यास सांगितले नाही, अशी महत्त्वाची माहिती मोदी यांनी दिली.