नवी दिल्ली : संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या (Budget session) दुसऱ्या टप्प्यास आजपासून सुरुवात होत आहे. दरम्यान आज विरोधक महागाई, फेडरल एजन्सींचा कथित गैरवापर, स्टेट बँक ऑफ इंडिया आणि भारतीय आयुर्विमा महामंडळाचा अदानी समुहाला झालेला खुलासा यांसारख्या वादग्रस्त मुद्द्यांवरून सरकारची कोंडी करण्याचा प्रयत्न करेल. तर दुसरीकडे सत्ताधारी देखील विरोधकांचा डाव हाणून पाडण्याच्या तयारीत असेल. तसेच काँग्रेस नेते राहुल गांधींनी लंडनमध्ये केलेल्या एका वक्तव्यावरून सत्ताधारी काँग्रेस पक्षाला कोंडीत पकडण्याच्या तयारीत असणार आहेत.
दरम्यान अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या दुसऱ्या टप्प्यात दोन्ही सभागृहात रणनीती ठरविण्यासाठी आज सोमवारी सकाळी विरोधी पक्षांची बैठक होणार असल्याची माहिती समोर आली आहे. यावेळी लोकसभेतील काँग्रेसचे व्हिप मणिकम टागोर म्हणाले, आम्ही लोकांचे प्रश्न मांडत राहू. दरवाढ, एलपीजीची किंमत, अदानी, एजन्सीचा गैरवापर, शेतकऱ्यांचे प्रश्न, राज्यपालांचा हस्तक्षेप यावर आम्ही जाब विचारणार आहोत. तसेच यासाठी विरोधकांनी एकजूट दाखवावी अशी आमची इच्छा आहे.
‘नॉट रिचेबल’ हसन मुश्रीफ आज ईडी कार्यालयात हजर राहणार का?
ईडी, सीबीआय विरोधकांच्या रडारवर
विरोधी पक्षांची मुस्कटदाबी करण्यासाठी सत्ताधारी ईडी तसेच सीबीआयचा गैरवापर करतात असा दावा विरोधकांकडून करण्यात येत आहे. यातच अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या दुसऱ्या टप्प्यात विरोधक या मुद्द्यांवरून सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधेल.अंमलबजावणी संचालनालय (ईडी) आणि केंद्रीय अन्वेषण ब्युरो (सीबीआय) यांच्याकडून विरोधी नेत्यांवर टाकलेल्या छाप्यांचा मुद्दा यावेळी उपस्थित केला जाण्याची शक्यता आहे. या मुद्द्यावर विरोधी पक्षांनी भारतीय जनता पक्षावर (भाजप) टीका केली आहे.
ऑस्ट्रेलियाला धोबीपछाड देत भारतीय हॉकी संघाची विजयी खेळी
दुसरा टप्पा 6 एप्रिलपर्यंत चालणार
अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा दुसरा टप्पा हा 6 एप्रिलपर्यंत चालणार आहे. दुसऱ्या टप्प्यात एकूण 17 बैठका होणार आहे. या टप्प्यात अनेक वित्त विधेयके आणि प्रलंबित विधेयके मंजूर करण्याची सरकारकडून तयारी करण्यात आली आहे. सध्या राज्यसभेत 26 आणि लोकसभेत 9 विधेयके मंजूर होण्यासाठी प्रलंबित आहेत.