Download App

Hathras Stampede: मुख्यमंत्री योगींकडे सोपवला 15 पानी SIT अहवाल; किती जणांचे घेतले जबाब?

उत्तर प्रदेशातील हाथरस येथे सत्संगमध्ये झालेल्या चेंगराचेंगरीच्या दुर्घटनेचा अहवाल तेथील पोलीस अधिकाऱ्यांनी मुख्यमंत्र्यांकडं सुपुर्द केला.

Hathras Satsang Incident SIT Report :  उत्तर प्रदेशातील हाथरस (Hathras) येथे भोले बाबाच्या सत्संगात घडलेल्या चेंगराचेंगरीच्या दुर्घटनाप्रकरणाचा एसआयटी (SIT)अहवाल समोर आला आहे. (Satsang ) यूपीचे डीजीपी प्रशांत कुमार आणि मुख्य सचिव मनोज कुमार सिंह यांनी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या ५ कालिदास मार्गावरील अधिकृत निवासस्थानी जाऊन मुख्यमंत्र्यांची भेट घेतली आणि हा अहवाल त्यांच्याकडे सुपूर्द केला.

विरोधी पक्षनेते राहुल गांधी अलिगडला पोहचले; हाथरस सत्संग चेंगराचेंगरीतील मृतांच्या कुटुंबाची घेतली भेट

एसआयटीचा हा अहवाल एडीजी आग्रा आणि अलिगड आयुक्तांच्या नेतृत्वाखाली तयार करण्यात आला आहे. 15 पानांच्या या सविस्तर अहवालात डीएम आणि एसपीसह सुमारे 100 लोकांचे जबाब नोंदवण्यात आले आहेत. एसआयटी टीमने प्रशासकीय अधिकारी, कार्यक्रमाशी संबंधित लोक आणि सेवा कर्मचाऱ्यांशी चर्चा केली आणि संपूर्ण अपघाताचं कारण आणि प्रचंड गर्दी यासंबंधी सर्व माहिती गोळा केली.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, हाथरस डीएम एसपी व्यतिरिक्त भोले बाबाचे नावही एसआयटीच्या तपास यादीत आहे. या सर्वांचे जबाबही नोंदवले जाणार आहेत. अशा परिस्थितीत ही टीम व्यक्तिश: जाऊन भोले बाबाला भेटणार? की भोले बाबाला बोलवलं जाणार? असा प्रश्न उपस्थित होत आहे. आतापर्यंत पोलिसांना भोले बाबाचा कोणताही सुगावा लागू शकलेला नाही. अशा स्थितीत बाबांचा जबाब कसा नोंदवला जाणार? याबाबत कोणाकडेही ठोस माहिती नाही.

Team India : विजयाचा जल्लोष, वानखडे स्टेडियममध्ये टीम इंडियाने धरला ढोल ताशावर ठेका, पाहा व्हिडिओ…

एडीजी आग्रा झोन अनुपम कुलश्रेष्ठ यांनी सांगितलं की, एसआयटीचा तपास सुरू आहे. त्यात अनेकांचे जबाब नोंदवण्यात आले आहेत. यापुढेही अनेकांचे जबाब नोंदवले जातील. त्याबाबतचा तपास आज सायंकाळपर्यंत पूर्ण होईल असा अंदाज आहे. तो पूर्ण झाल्यानंतर दुसरा अहवालही सरकारला पाठवला जाणार आहे.

follow us