काँग्रेसचं वजन वाढलं! विधान परिषदेच्या ६ आमदारांनी केला काँग्रेसमध्ये प्रवेश

काँग्रेसचं वजन वाढलं! विधान परिषदेच्या ६ आमदारांनी केला काँग्रेसमध्ये प्रवेश

Congress : काँग्रेसची ताकद गेल्या वेळेपेक्षा वाढली आहे. लोकसभे काँग्रेसने चांगलीच मुसंडी मारली आहे. (Congress) आता काँग्रेसमध्ये इनकमिंग सुरू झाल्याचं चित्र आहे. काँग्रेसची (Telangana) तेलंगणामध्ये ताकद वाढली आहे. राज्यातील सहा विधान परिषदेच्या आमदारांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. त्यामुळे भारत राष्ट्र समितीसाठी हा मोठ्ठा धक्का मानला जात आहे. बीआरएसच्या सहा आमदारांनी मुख्यमंत्री रेवंथ रेड्डींच्या उपस्थित काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे.

रेड्डी राजकडून घोषणांची अंमलबजावणी; महिलांना मोफत बस ते विमा योजनेच्या अनुदानात वाढ

मागील वर्षी झालेल्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसने रेवंथ रेड्डींच्या नेतृत्त्वात मोठा विजय मिळवला आहे. त्यानंतर बीआरएसच्या अनेक आमदारांनी पक्षाची साथ सोडली आहे. रात्री उशिरा दांडे विठ्ठल, भानु प्रसाद राव, एम एस प्रभाकर, बोग्गरापू दयानंद, येग्मे मल्लेशम आणि बसवराजू सरैया यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्याचं सूत्रांनी सांगितलं.

बीआरएसचे सहा विधान परिषदेचे आमदार मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी आले होते. यावेळी काँग्रेस प्रभारी दीपा दासमुंथी आणि अन्य काही नेते देखील उपस्थित होते. बीआरएसकडे २५ विधान परिषदेचे सदस्य आहेत, तर तेलंगणाची विधान परिषदेत ४० सदस्यांची आहे. यात चार नाव निर्देशित सदस्य असतात. याशिवाय ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीनचे दोन आणि भारतीय जनता पक्षाचे एक आणि पीआरटीयूचा एक असे सदस्य आहेत. एक अपक्ष सदस्य आहे आणि दोन जागा रिक्त आहेत.

विरोधी पक्षनेते राहुल गांधी अलिगडला पोहचले; हाथरस सत्संग चेंगराचेंगरीतील मृतांच्या कुटुंबाची घेतली भेट

भारत राष्ट्र समितीचे सहा आमदार आल्याने काँग्रेसची विधान परिषदेतील एकूण संख्या १० झाली आहे. सूत्रांच्या दाव्यानुसार येत्या काळात इतर काही आमदार देखील काँग्रेसमध्ये प्रवेश करू शकतात. तेलंगणामध्ये विधानसभेच्या एकूण ११९ जागा आहे. त्यातील ३९ जागा भारत राष्ट्र समितीने जिंकल्या आहेत, तर काँग्रेसला ६४ जागांवर विजय मिळवता आला आहे. बीआरएसच्या एका आमदाराचा रस्ते अपघातात मृत्यू झाला होता. त्याठिकाणी झालेल्या पोटनिवडणुकीत काँग्रेसच्या उमेदवाराचा विजय झाला आहे. त्यामुळे काँग्रेसचे एकूण संख्याबळ ६५ झाले आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

वेब स्टोरीज