काय कारवाई होणार?, हाथरस सत्संग दुर्घटनेचा तपास अहवाल ‘SIT’ आज सरकारकडे सुपुर्द करणार

काय कारवाई होणार?, हाथरस सत्संग दुर्घटनेचा तपास अहवाल ‘SIT’ आज सरकारकडे सुपुर्द करणार

Report of Hathras Satsang incident SIT : उत्तर प्रदेशातील हाथरस सत्संग (Satsang) दुर्घटनेचा एसआयटी तपास अहवाल आज सरकारला सादर केला जाणार आहे. एडीजी आग्रा आणि अलिगड आयुक्तांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या तपासात डीएम-एसएसपीसह 132 लोकांचे जबाब घेतले जाणार आहेत. (SIT ) ज्यामध्ये साकार हरी भोले बाबा याचंही नाव आहे. (Hathras ) पथकाकडून जबाब नोंदवण्याची प्रक्रिया काल रात्रीपर्यंत सुरू करण्यात आली होती.

विरोधी पक्षनेते राहुल गांधी अलिगडला पोहचले; हाथरस सत्संग चेंगराचेंचगीतील मृत्यांच्या कुटुंबाची घेतली भेट

मंगळवारी झालेल्या दुर्घटनेनंतर सरकारने एडीजी आग्रा झोन अनुपम कुलश्रेष्ठ यांच्या अध्यक्षतेखाली एसआयटीची स्थापना केली होती. ज्यामध्ये विभागीय आयुक्त चैत्रा बी. यांचा देखील समावेश करण्यात आला होता. अपघातानंतर बुधवारी सकाळपर्यंत मदत आणि बचाव कार्य आणि त्यानंतर दुपारी मुख्यमंत्र्यांचा दौरा यामुळे एसआयटीच्या तपासाला गती मिळू शकली नाही.

100 हून अधिक जणांचे जबाब

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी अदित्यनाथ यांनी दुर्घटनास्थळी भेट दिल्यानंतर तपासाला वेग आला. यामध्ये अगोदर मसुदा तयार करण्यात आला. जबाब कुणाचे नोंदवण्यात यावेत याची यादी तयार करण्यात आली. तसंच, जबाब नोंदवण्याची वेळ निश्चित करण्यात आली. या सर्वांची पोलीस लाईनच्या आवारात चौकशी करण्यात येत आहे. गुरुवारी रात्रीपर्यंत 100 हून अधिक जणांचे जबाब नोंदवण्यात आले. त्यानंतर आज अहवाल सादर करण्यात येणार आहे.

भेटणार की बोलावणार हेमंत सोरेन पुन्हा झारखंडच्या मुख्यमंत्रिपदी; राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांनी दिली शपथ

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, हाथरस डीएम एसपी व्यतिरिक्त भोले बाबाचे नावही एसआयटीच्या तपास यादीत आहे. या सर्वांचे जबाबही नोंदवले जाणार आहेत. अशा परिस्थितीत ही टीम व्यक्तिश: जाऊन भोले बाबाला भेटणार की भोले बाबाला बोलवलं जाणार, असा प्रश्न उपस्थित होत आहे. आतापर्यंत पोलिसांना भोले बाबाचा कोणताही सुगावा लागू शकलेला नाही. अशा स्थितीत बाबांचा जबाब कसा नोंदवला जाणार? याबाबत कोणाकडेही ठोस माहिती नाही.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

संबंधित बातम्या

वेब स्टोरीज