Download App

सुप्रीम कोर्टाला मिळणार दोन नवे न्यायाधीश! कॉलेजियमकडून ‘या’ दोन नावांची शिफारस

Supreme Court Collegium: सुप्रीम कोर्टातील न्यायाधीशांच्या 34 मंजूर पदांपैकी 2 पदे रिक्त आहेत. कॉलेजियमने आंध्र प्रदेश उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश प्रशांत कुमार मिश्रा (Prashant Kumar Mishra) आणि ज्येष्ठ वकील केव्ही विश्वनाथन (KV Viswanathan) यांच्या नियुक्तीसाठी केंद्र सरकारला शिफारस पाठवली. जर सरकारने या शिफारसी मान्य केल्या तर विश्वनाथन 2030 मध्ये सरन्यायाधीश (CJI) होऊ शकतात.

न्यायमूर्ती प्रशांत कुमार मिश्रा यांची 13 ऑक्टोबर 2021 रोजी आंध्र प्रदेश उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. न्यायमूर्ती प्रशांत कुमार मिश्रा यांनी यापूर्वी छत्तीसगड उच्च न्यायालयाचे कार्यवाहक मुख्य न्यायाधीश म्हणूनही काम पाहिले आहे. त्यांनी छत्तीसगड उच्च न्यायालयाचे न्यायाधीश म्हणूनही काम केले आहे. आणि के.व्ही.विश्वनाथन हे सर्वोच्च न्यायालयाचे ज्येष्ठ वकील आहेत.

पंतप्रधान मोदींच्या दौऱ्यापूर्वी अमेरिकेचा भारताला दणका, जारी केला ‘हा’ अहवाल

मूळचे कोईम्बतूरचे रहिवासी असलेले विश्वनाथन जर सरन्यायाधीश झाले तर ते न्यायमूर्ती एसएम सिक्री, यूयू ललित आणि पीएस नरसिम्हा यांच्यानंतरचे चौथे वकील असतील. सरन्यायाधीश डीवाय चंद्रचूड यांच्या नेतृत्वाखालील कॉलेजियमने एक ठराव मंजूर केला आहे की सर्वोच्च न्यायालयात 34 न्यायाधीशांची मंजूर संख्या आहे आणि सध्या 32 न्यायाधीश कार्यरत आहेत. त्यामुळे दोन पदे रिक्त आहेत. येत्या काही महिन्यांत आणखी चार न्यायाधीश निवृत्त होणार आहेत, असे त्यात म्हटले आहे.

खासदार संजय राऊत यांना अटकपूर्व जामीन मंजूर

कॉलेजियमने, विद्यमान दोन रिक्त पदे भरण्यासाठी नावांची शिफारस करण्याचा एकमताने ठराव केला आहे. कॉलेजियमने सर्वोच्च न्यायालयात नियुक्तीसाठी मुख्य न्यायमूर्ती आणि वरिष्ठ उप न्यायमूर्तींच्या नावांवर चर्चा केली. न्यायमूर्ती दिनेश माहेश्वरी आणि न्यायमूर्ती एमआर शहा यांच्या निवृत्तीनंतर सर्वोच्च न्यायालयात दोन पदे रिक्त आहेत. न्यायमूर्ती एम.आर.शाह यांच्या निवृत्तीनंतर रिक्त पदे भरण्यासाठी नव्याने स्थापन झालेल्या कॉलेजियमची बैठक झाली. न्यायमूर्ती संजीव खन्ना हे सरन्यायाधीश बनण्याच्या पंक्तीत आहेत. न्यायमूर्ती खन्ना आता कॉलेजियमचे पूर्णवेळ सदस्य आहेत.

Tags

follow us