पंतप्रधान मोदींच्या दौऱ्यापूर्वी अमेरिकेचा भारताला दणका, जारी केला ‘हा’ अहवाल

पंतप्रधान मोदींच्या दौऱ्यापूर्वी अमेरिकेचा भारताला दणका, जारी केला ‘हा’ अहवाल

US Report On Religious Freedom : पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi)पुढील महिन्यात अमेरिकेच्या (America)दौऱ्यावर जाणार आहेत. त्याधीच अमेरिकेने धार्मिक अल्पसंख्यांकांवरुन (religious minorities)भारतावर निशाणा साधला आहे. अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने धार्मिक स्वातंत्र्याबाबत एक अहवाल (Report)प्रसिद्ध केला आहे. त्यामध्ये भारतातील अल्पसंख्यांकांवर झालेल्या हिंसाचाराच्या 20 हून अधिक घटनांचा उल्लेख करण्यात आला आहे.

गौतमीच्या अदाकारीने आता महिलाही होणार घायाळ; तब्बल एवढ्या महिलांनी केले तिकीट बूक

अहवालाबाबत एका वरिष्ठ अमेरिकन अधिकाऱ्याने सांगितले की, भारताने सुरू असलेल्या धार्मिक हिंसाचाराचा निषेध करावा अशी अमेरिकेची इच्छा आहे. 2022 साठी जारी केलेल्या या अहवालात भारतातील मुस्लिम आणि ख्रिश्चनांसह धार्मिक अल्पसंख्याकांवर होणाऱ्या हल्ल्यांवर भाष्य केले आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी पुढील महिन्यात अमेरिकेच्या दौऱ्यावर जाणार आहेत. त्याचवेळी अमेरिकन अधिकाऱ्याकडून असे वक्तव्य आल्याने एकच खळबळ उडाली आहे. भारतातील मुस्लिम आणि ख्रिश्चनांसह धार्मिक अल्पसंख्याकांवर होणाऱ्या हल्ल्यांवर प्रकाश टाकणारा अमेरिकेच्या परराष्ट्र विभागाने धार्मिक स्वातंत्र्यावरील वार्षिक अहवाल प्रसिद्ध केला आहे.

मुस्लिम, ख्रिश्चन आणि इतर अल्पसंख्याकांवरील हल्ल्यांचा उल्लेख करुन, एका अमेरिकन अधिकाऱ्याने सांगितले की, ते नागरी समाजाच्या सदस्यांसह, धैर्यवान पत्रकारांसोबत काम करत राहतील आणि या समस्यांचे निराकरण करण्यासाठी त्यांच्या समकक्षांशी थेट बोलतील.

मीडिया आणि वकिलांच्या गटांच्या संशोधनावर आधारित यूएस स्टेट डिपार्टमेंटच्या अहवालात, गुजरातमध्ये हिंदूंवर हल्ले केल्याचा आरोप असलेल्या मुस्लिमांना घरे फोडणे आणि सार्वजनिकपणे मारहाण केल्याबद्दल चिंता व्यक्त केली आहे.

योगी आदित्यनाथ यांच्या सरकारमध्ये उत्तर प्रदेशातील काही मुस्लिमांच्या घरांवर बुलडोझर चालवल्याचाही या अहवालात उल्लेख आहे. यासोबतच 2002 च्या बिल्किस बानो सामूहिक अत्याचाराच्या 11 दोषींच्या सुटकेचाही अहवालात उल्लेख करण्यात आला आहे.

धार्मिक स्वातंत्र्य अहवाल 2022 सादर करताना, अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री अँटोनी ब्लिंकन (US Secretary of State Anthony Blinken)यांनी चीन, इराण, म्यानमार आणि निकाराग्वा यांना धार्मिक हिंसाचारावरुन इशारा दिला पण भारताचा कुठेही उल्लेख केला नाही.

ते म्हणाले, आम्ही धर्म मानण्याचा किंवा न मानण्याचा अधिकार जपतो. केवळ ते योग्य आहे म्हणून नाही तर त्या धर्माचे अनुयायी आपल्या समाजाच्या आणि जगाच्या भल्यासाठी मोठे कार्य करू शकतात.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube