Download App

ऑपरेशन सिंदूर आणखी आठवडाभर….; पाकला कंटाळलेल्या बलुच नेत्याचं थेट मोदींना भलं मोठं पत्र…

Operation Sindoor : पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा बदला घेण्यासाठी भारतीय लष्कराने ऑपरेशन सिंदूर (Operation Sindoor) राबवत

Operation Sindoor : पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा बदला घेण्यासाठी भारतीय लष्कराने ऑपरेशन सिंदूर (Operation Sindoor) राबवत पाकिस्तानमधील (Pakistan) 9 दहशतवादी ठिकाणांवर हवाई हल्ला करत 100 पेक्षा जास्त दहशतवाद्यांना ठार मारले आहे. ऑपरेशन सिंदूरची चर्चा संपूर्ण जगात होत असताना बलुचिस्तानचे (Balochistan) मानवाधिकार कार्यकर्ते आणि पत्रकार मीर यार बलोच यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) यांना पत्र लिहून पाकिस्तानवर जोरदार हल्लाबोल केला आहे.

मीर यार बलोच यांनी लिहिलेल्या पत्राच्या सुरुवातीला जगाला पाकिस्तानचे अणुशस्त्रे जप्त करण्याचे आवाहन केले आहे. तसेच त्यांनी या पत्रामध्ये पाकिस्तानने बलुचिस्तानमध्ये केलेल्या अणुचाचण्यांना नरसंहाराचा उल्लेख देखील केला आहे. याच बरोबर त्यांनी भारताने बलुचिस्तानच्या स्वातंत्र्यलढ्यात उघडपणे पाठिंबा द्यावा असे आवाहन देखील त्यांनी पंतप्रधान मोदींना केले आहे.

मीर यार बलोच लिहिले आहे की पाकिस्तानी सैन्याने नवाज शरीफ सरकारच्या संगनमताने बलुचिस्तानची भूमी उद्ध्वस्त केली. या स्फोटांमुळे चगाई आणि रास कोहच्या टेकड्यांमध्ये अजूनही स्फोटकांचा वास येतो. त्यांनी नमूद केले आहे की या चाचणीमुळे अनेक शेती नष्ट झाली, गुरेढोरे मृत्युमुखी पडली, मुले अपंगत्वाने जन्माला येत आहेत.

पाकिस्तानी सैन्य आणि आयएसआय हे दहशतवादाचे जनक

पत्रात, बलुचिस्तान नेत्याने थेट पाकिस्तानी सैन्य आणि आयएसआयवर दहशतवादी संघटना निर्माण केल्याचा आरोप केला आहे. त्यांनी असा दावा केला की आयएसआय दर महिन्याला एक नवीन दहशतवादी संघटना तयार करते आणि त्यांचा वापर भारत, अफगाणिस्तान, बलुचिस्तान, अगदी अमेरिका आणि इस्रायलविरुद्ध करते. बलुच नेत्याने म्हटले आहे की, पाकिस्तान दहशतवादाची जननी आहे. जोपर्यंत त्याची मुळे उखडली जात नाहीत तोपर्यंत दहशतवाद संपणार नाही.

Manipur Politics : मणिपूरमध्ये पुन्हा भाजप सरकार? 10 आमदारांनी घेतली राज्यपालांची भेट 

भारताने आम्हाला पाठिंबा द्यावा

या पत्रात मीर यार बलोच यांनी दावा केला आहे की, जेव्हा भारताने पाकिस्तान विरोधात ऑपरेशन सिंदूर राबविला तेव्हा बलुचिस्तानच्या लोकांनी भारताला जाहीर पाठींबा दिला होता. तसेच जर ऑपरेशन सिंदूर आणखी एक आठवडा सुरु राहिला असता तर आज आपण एक स्वतंत्र राष्ट्र म्हणून भारताशी बोललो असतो. तसेच स्वतंत्र्य बलूचिस्तानसाठी भारताने आम्हाला पाठिंबा द्यावा असा आवाहन देखील या पत्रात मीर यार बलोच यांनी पंतप्रधान मोदींना केला आहे.

follow us