ब्रेकिंग : पाकिस्तान सीमेवरील चार राज्यांमध्ये उद्या पुन्हा मॉक ड्रील; अलर्ट राहण्याच्या सूचना

  • Written By: Published:
ब्रेकिंग : पाकिस्तान सीमेवरील चार राज्यांमध्ये उद्या पुन्हा मॉक ड्रील; अलर्ट राहण्याच्या सूचना

Civil Defence Mock Drill In 4 States Bordering Pakistan Tomorrow : पाकिस्तानच्या सीमेला लागून असलेल्या चार राज्यांमध्ये उद्या (दि.29) संध्याकाळी मॉक ड्रिल घेतले जाणार आहे. गुजरात, राजस्थान, पंजाब आणि जम्मू आणि काश्मीरमध्ये याचे आयोजन करण्यात आले असून, येथील नागरिकांना सतर्क राहण्याच्या आणि घाबरून न जाण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

15 वर्षांची प्रतिक्षा संपली! WhatsApp अखेर iPad वर… ‘ही’ खास वैशिष्ट्ये आहेत

मॉक ड्रिलचे आयोजन अन् पाकिस्तानवर थेट हल्ला

पाकिस्तानसोबतच्या तणावाच्या पार्श्वभूमीवर 7 मे रोजी देशातील 244 जिल्ह्यांमध्ये मॉक ड्रिल आयोजित करण्याची घोषणा करण्यात आली होती. मात्र, पण 6-7 मे च्या रात्री भारताने पाकिस्तानमधील दहशतवादी छावण्यांवर ऑपरेशन सिंदूर राबवत लष्करी कारवाई केली. ऑपरेशन सिंदूर अंतर्गत भारताने पाकिस्तानमधील नऊ दहशतवादी छावण्यांवर अचूक हल्ला केला, ज्यामध्ये अनेक दहशतवादी मारले गेले. त्यानंतर दोन्ही देशांकडून युद्धबंदीची घोषणा करण्यात आली. मात्र, ऑपरेशन सिंदूर यशस्वी झाल्यानंतर पुन्हा पाकिस्तानला लागून असलेल्या गुजरात, राजस्थान, पंजाब आणि जम्मू आणि काश्मीरमध्ये आता पुन्हा एकदा मॉक ड्रील केले जाणार आहे.

आणखी 12 ठिकाणांची यादी तयार

ऑपरेशन सिंदूर यशस्वी करून एकीकडे भारतीय लष्कराने पाकिस्ताने कंबरडे मोडले आहे. तसेच आमची लढाई ही पाकिस्तानी नागरिकांशी नसून दहशतवादाविरोधाची असल्याचे भारताकडून स्पष्ट करण्यात आले आहे. तसेच भारताकडे उद्धवस्त केलेल्या 9 दहशतवादी अड्ड्यांशिवाय आणखी 12 दहशतवादी अड्ड्यांची यादीदेखील तयार असल्याचे भारताने पाकिस्तानला सांगितले आहे.

ऐकावं ते नवलचं! लफडं बाहेर काढेल; शटडाऊन करायला सांगणाऱ्या इंजीनिअरला AI ची धमकी

चार दिवसात पाकिस्ताचं कबरडं मोडलं

२२ एप्रिल रोजी झालेल्या पहलगाम हल्ल्याचा बदला घेण्यासाठी भारताने 6- 7 मे च्या रात्री ऑपरेशन सिंदूर सुरू केले. सुमारे २५ मिनिटे चाललेल्या या कारवाईत भारतीय सैन्याने पाकिस्तान आणि पीओकेमधील 9 दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त केले. या कारवाईत भारतीय सैन्याने जैश-ए-मोहम्मद, लष्कर-ए-तैयबा आणि हिजबुल मुजाहिदीनचे अड्डे उडवून देत 100 हून अधिक दहशतवाद्यांचा खात्मा केला. त्यानंतर पाकिस्तानकडून भारतावर प्रतिहल्ला करण्याचा प्रयत्न करण्यात आला. पण, भारतीय लष्कराकडून पाकिस्तानचा प्रत्येक हल्ला अयशस्वी करत हाणून पाडण्यात आला. 7 ते 10 मे पर्यंत चार दिवस चाललेल्या लष्करी कारवाईनंतर पाकिस्तानच्या विनंतीवरून 10 मे रोजी युद्धबंदी जाहीर करण्यात आली.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube