Download App

ममतांनी केली 42 उमेदवारांची घोषणा: युसूफ पठाण, शत्रुघ्न सिन्हा आणि कीर्ती आझाद यांना लॉटरी

TMC candidates list : तृणमूल काँग्रेसने (TMC candidates list) रविवारी पश्चिम बंगालमधील लोकसभेच्या 42 जागांसाठी आपले उमेदवार जाहीर केले. बहारमपूर मतदारसंघातून काँग्रेसचे खासदार अधीर रंजन चौधरी यांच्या विरोधात तृणमूलने क्रिकेटर युसूफ पठाणला (Yusuf Pathan) उमेदवारी दिली आहे. तसेच ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) यांचा पुतण्या अभिषेक बॅनर्जी, क्रिकेटर कीर्ती आझाद, मागील लोकसभेतून निलंबित केलेल्या महुआ मोईत्रा, अभिनेते शत्रुघ्न सिन्हा यांना देखील उमेदवारी देण्यात आली आहे.

याशिवाय आसनसोलमधील अभिनेता शत्रुघ्न सिन्हा आणि दुर्गापूर येथील माजी क्रिकेटपटू कीर्ती आझाद यांच्या नावांचा समावेश आहे. टीएमसीने बशीरहाट लोकसभा मतदारसंघातून अभिनेत्री नुसरत जहाँ आणि जाधवपूर मतदारसंघातून अभिनेत्री मिमी चक्रवर्ती यांचे तिकीट कापले आहे.

जागावाटपाचं घोंगड भिजत तरी युती-आघाडीचे मुंबईतील उमेदवार जाहीर, यांना मिळणार संधी!

TMC च्या 42 नावांची यादी
तृणमूल काँग्रेसने कूचबिहारमधून जगदीश चंद्र बसू, अलीपुरद्वारमधून प्रकाश चिक बराईक, जलपाईगुडीमधून निर्मल चंद्र रॉय, दार्जिलिंगमधून गोपाल लामा, रायगंजमधून कृष्णा कल्याणी, बालूरघाटमधून बिप्लब मित्रा यांना उमेदवारी दिली आहे.

राष्ट्रवादीत जाण्याच्या चर्चांदरम्यान आढळराव-मोहितेंचं मनोमिलन; शिरूरमध्ये आढळरावांचा मार्ग मोकळा?

मालदा नॉर्थमधून प्रसून बॅनर्जी, मालदा दक्षिणमधून शाहनवाज अली रेहान, जंगीपूरमधून खलीलूर रहमान, बेहरामपूरमधून युसूफ पठाण, कृष्णानगरमधून महुआ मोईत्रा, राणाघाटमधून मुकुटमणी अधिकारी, डमडममधून सौगता राय, बीरभूममधून शताब्दी राय, हुगलीमधून रचना बानर्जी, आसनसोलमधून शत्रुघ्न सिन्हा, जादवपूरमधून सयोनी घोष आणि दुर्गापूरमधून कीर्ती आझाद आणि डायमंड हार्बरमधून अभिषेक बॅनर्जी यांच्या नावांचा समावेश आहे.

Udhhav Thackeray यांचा शिंदे गटावर मोठा डाव; कीर्तीकरांच्या उत्तर पश्चिममध्ये मुलगा अमोलला उमेदवारी जाहीर

follow us