Download App

Rahul Gandhi यांना दिलासा नाहीच, सुरत कोर्टाने याचिका फेटाळली

  • Written By: Last Updated:

गुजरातमधील सुरत सत्र न्यायालयाकडून काँग्रेस नेते राहुल गांधी यांना पुन्हा धक्का दिला आहे. सुरत न्यायालयाने राहुल गांधी यांचा अर्ज फेटाळला आहे. राहुल गांधी यांनी मोदी आडनावावर केलेल्या टिप्पणीवरून बदनामी केल्याप्रकरणी सत्र न्यायालयाने सुनावलेल्या शिक्षेवर स्थगिती मागितली होती.

2019 च्या लोकसभा निवडणुकीदरम्यान कर्नाटकमधील एका सभेत राहुल गांधींनी ‘मोदी आडनावाबाबत वक्तव्य केले होते. या वक्तव्याबाबत भाजप आमदार पूर्णेश मोदी यांनी राहुल यांच्यावर मानहानीचा दावा दाखल केला होता. चार वर्षांनंतर 23 मार्च रोजी सुरतच्या कनिष्ठ न्यायालयाने राहुलला दोषी ठरवून दोन वर्षांच्या कारावासाची शिक्षा सुनावली.

BRS Meeting : के. चंद्रशेखर रावांच्या छत्रपती संभाजीनगरमधील सभेला परवानगी मिळाली पण…

या शिक्षेमुळे लोकप्रतिनिधी कायद्यांतर्गत राहुल गांधी यांचे संसद सदस्यत्व लोकसभा सचिवालयाने रद्द केले आहे. राहुल गांधी केरळमधील वायनाडमधून खासदार होते. लोकप्रतिनिधी कायद्यात अशी तरतूद आहे की एखाद्या प्रकरणात खासदार आणि आमदाराला 2 वर्षे किंवा त्याहून अधिक शिक्षा झाल्यास त्यांचे सदस्यत्व (संसद आणि विधानसभेतून) रद्द केले जाते. एवढेच नाही तर शिक्षेचा कालावधी पूर्ण झाल्यानंतर ते सहा वर्षे निवडणूक लढण्यासही अपात्र ठरतात.

दरम्यान स्वातंत्र्यवीर सावरकर यांची बदनामी केल्याप्रकरणी त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राहुल गांधींच्या विरोधात पुण्यामध्ये तक्रार करण्यात आली आहे. राहुल गांधी यांनी केंब्रिज विद्यापीठात 28 फेब्रुवारी रोजी भाषण दिले होते त्यावेळी त्यांनी सावकरांविषयी आक्षेपार्ह विधान केले होते.

Atiq-Ashraf च्या मारेकऱ्याची कबूली, हत्यारं देणाऱ्यांची सांगितली नावं

स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे नातू सत्यकी सावरकर यांनी राहुल गांधींच्या विरोधात पुणे न्यायालयामध्ये बदनामीचा खटला दाखल केला आहे. त्यामुळे राहुल गांधींच्या अडचणीत आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. सावरकरांची प्रतिष्ठा खराब करण्याचा प्रयत्न राहुल गांधींनी केल्याचा आरोप त्यांनी केला आहे.

Tags

follow us