BRS Meeting : के. चंद्रशेखर रावांच्या छत्रपती संभाजीनगरमधील सभेला परवानगी मिळाली पण…

BRS Meeting : के. चंद्रशेखर रावांच्या छत्रपती संभाजीनगरमधील सभेला परवानगी मिळाली पण…

BRS Meeting In Chhatrapati Sambhaji Nagar: के. चंद्रशेखर राव यांच्या भारत राष्ट्र समितीचा राष्ट्रीय राजकारणात प्रवेश झाला आहे. या प्रवेशाची नांदी करताना त्यांनी राष्ट्रीय राजकारणातील प्रवेशाची पहिली सभा रविवारी 5 एप्रिल नांदेड येथे पार पडली. त्यावेळी के. चंद्रशेखर राव हे शेतकऱ्यांना संबोधित होते. यावेळी हजारोंच्या संख्येने नांदेड आणि आजुबाजूच्या भागातील शेतकरी उपस्थित होते.

त्यानंतर आता राज्यातील अनेक नेत्यांनी बीआरएसमध्ये प्रवेश केल्यानंतर के. चंद्रशेखर राव यांनी आपला मोर्चा छत्रपती संभाजीनगरकडे वळवला आहे. 24 एप्रिलला बीआरएसचा दुसरी सभा छत्रपती संभाजीनगरमध्ये पार पडणार आहे. या सभेला आता पोलिसांनी देखील परवानगी मिळाली आहे. मात्र या सभेचं ठिकाण बदलण्यात आलं आहे.

पक्षाची सभा अगोदर आमखास मैदानावर सभा घेण्याचं पक्षाचं नियोजन होते, मात्र पोलिसांनी आयोजकांना जागा बद्दलण्याबाबत सूचना केल्या होत्या. त्यानुसार आता सभा बीड बायपास येथील जबिंदा मैदानावर होणार आहे. त्यामुळे आता या सभेमध्ये के. चंद्रशेखर राव काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

K Chandrashekhar Rao यांचे फडणवीसांना चॅलेंज…तर मी महाराष्ट्रात येणार नाही!

दरम्यान गेल्या वेळी त्यांनी नांदेडमध्ये शेतकऱ्यांना संबोधित केले होते. यावेळी ते म्हणाले होते की, आपली चूक काय झाली माहितीय का, आपण हल (शेती) चालवत राहिलो आणि कलम (पेन) चालवण्याची जबाबदारी दुसऱ्यांना दिली. त्यामुळे आपण मागे राहिलो. जयप्रकाश नारायण यांच्या एका आवाजामुळे सर्व देश एकत्र आला होता. आता ती वेळ परत आली आहे. आपण सर्व शेतकरी एकत्र येऊन या देशात खऱ्या अर्थाने शेतकऱ्यांचे सरकार आले पाहिजे. त्यामुळे आपला नारा ‘अब की बार किसान सरकार’ हा आहे. तो तुम्ही घरोघरी द्या. बघा कसा बदल होतोय की नाही आणि शेतकऱ्यांना चांगले दिवस आल्याशिवाय राहणार नाही, असा विश्वास के. चंद्रशेखर राव यांनी व्यक्त केली.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube