Download App

मोदींनी दिलेली मुदत संपली, मायदेशी परतण्यासाठी पाक नागरिकांची तारांबळ, सीमेवर रांगाच रांगा…

अटारी सीमेवर पाकिस्तानी नागरिकांनी त्यांच्या देशात प्रवेश करण्यासाठी गर्दी केल्याने वाहनांच्या लांब रांगा लागल्या. अ

  • Written By: Last Updated:

Pahalgam terrorist attack : पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर (Pahalgam terrorist attack) अटारी बॉर्डर (Attari Border) बंद करण्यात आली. भारताने पाकिस्तानी नागरिकांचे (Pakistani citizens) व्हिसा रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. आज (27 एप्रिल) पाकिस्तानी नागरिकांसाठी भारत सोडण्याचा शेवटचा दिवस आहे. अटारी सीमेवर पाकिस्तानी नागरिकांनी त्यांच्या देशात प्रवेश करण्यासाठी गर्दी केल्याने वाहनांच्या लांब रांगा लागल्या. अनेक भारतीय त्यांच्या पाकिस्तानी नातेवाईकांना निरोप देण्यासाठी अटारी येथे आले होते आणि त्यांच्या चेहऱ्यावर दुःख स्पष्टपणे दिसून येत होतं.

काहीजण कोंबडीवाले म्हणतात… पण भ्रष्टाचारापेक्षा व्यवसाय चांगला; नारायण राणेंचा रोख नेमका कोणाकडे? 

अटारी सीमेवर वाहनांच्या रांगा
भारत सरकारच्या आदेशानुसार, व्हिसावर भारतात आलेल्या पाकिस्तानी नागरिकांना आज म्हणजेच 27 एप्रिलपर्यंत अटारी सीमेवरून पाकिस्तानात परतावे लागणार आहे. ही अंतिम मुदत लक्षात घेऊन, राज्य सरकारे त्यांच्या भागात पाकिस्तानी लोकांना शोधत आहेत आणि त्यांना परत पाठवत आहेत. पाकिस्तानी नागरिकांसाठी भारत सोडण्याचा शेवटचा दिवस असल्याने अटारी सीमेवर पाकिस्तानी नागरिकांनी त्यांच्या देशात प्रवेश करण्यासाठी एकच गर्दी केलीये.

मी तिच्याशिवाय राहू शकत नाही…
माझी आई भारतीय आहे आणि तिला आमच्यासोबत पाकिस्तानला जाण्याची परवानगी नाहीये, मी माझ्या आईशिवाय राहू शकत नाही, किशोरवयीन मुलगी सरिता रडत म्हणाली. आम्ही नऊ वर्षांनी भारतात आलोय. मी, माझा भाऊ आणि माझे वडील पाकिस्तानी आहेत, तर आमची आई भारतीय आहे. ते (अटारीचे अधिकारी) आम्हाला सांगत आहेत की, ते माझ्या आईला आमच्यासोबत जाऊ देणार नाहीत. माझ्या आईवडिलांचे लग्न १९९१ मध्ये झाले. अधिकारी सांगताहेत की, भारतीय पासपोर्ट धारकांना पाकिस्तानमध्ये जायची परवानगी दिली जाणार नाही, असं सरित हमसून सांगत होती. मला माहित नाही की मी आईला पुन्हा कधी भेटू शकेल. रविवारी अटारी सीमेवर भारतातून बाहेर पडण्यासाठी रांगेत उभ्या असलेल्या शेकडो लोकांमध्ये सरिता, तिचा भाऊ आणि वडील होते. ते 29 एप्रिल रोजी होणाऱ्या एका नातेवाईकाच्या लग्नासाठी भारतात आले होते.

कौशल्य योजनेतूनच मिळते चांगले फलित; डॉ. नीलम गोर्‍हे, एसएसपीयू आणि युनेस्को यांच्यात सामंजस्य करार 

बहुतेक पाकिस्तानी नागरिकांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की ते त्यांच्या नातेवाईकांना भेटण्यासाठी भारतात आले होते. काही लोक लग्न समारंभांना उपस्थित राहण्यासाठी येथे आले होते, पण आता त्यांना लग्न समारंभांना उपस्थित न राहता घरी परतावे लागत आहे.

काही पाकिस्तानी नागरिकांनी दहशतवादी हल्ल्याचा निषेध केला आणि भारत पाकिस्तानमधील मैत्रीपूर्ण संबंधांची अपेक्षा व्यक्त केली. पेशावर येथील जनम राज (70) यांनी सांगितले की ते नातेवाईकांना भेटण्यासाठी 45 दिवसांच्या व्हिसावर आले होते. त्यांनी सांगितलं की, मी तीन आठवड्यांपूर्वी भारतात आलो होतो. मात्र, मुदत संपायच्या आधीच मला जावं लागतंय.

दहशतवाद्यांना फाशी द्या…
दिल्लीचा रहिवासी मोहम्मद आरिफ त्याच्या मावशीला अटारी येथे सोडण्यासाठी आला होता. पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा तीव्र निषेध करताना तो म्हणाला की, दहशतवाद्यांनी मानवतेची हत्या केली आहे आणि त्यांना सार्वजनिकरित्या फाशी देण्यात यावी.

 

 

follow us