Download App

Truck Driver Strike चा असाही परिणाम; पेट्रोल अभावी झोमॅटो बॉयची थेट घोड्याला टाच

Truck Driver Strike : हिट-अँड-रन प्रकरणी नवीन कायद्याला ट्रक चालकांनी (Truck Driver Strike) विरोध केला. देशभरात मोठ्या वाहनांचे चालक संपावर गेले होते. त्यामुळे देशभरात विविध सेवांवर परिणाम झाले होते. त्यामुळे झोमॅटोच्या एका डिलिव्हरी बॉयने एक अनोखी शक्कल लढवत ग्राहकाला डिलिव्हरी दिली आहे.

ऑनलाईन फूड डिलिव्हरी कंपन्यांना जेवणाची ऑर्डर देऊन ग्राहक अगदी आतुरतेने या जेवणाची वाट पाहत असतो. तसेच कंपन्यांकडून देखील ग्राहकांना तात्काळ जेवण पोहोच करण्याची आश्वासनही दिलेले असते. मात्र ही सगळी जबाबदारी असते. ती डिलिव्हरी बॉयवर त्यामुळे या डिलिव्हरीमध्ये कोणताही व्यत्यय येऊ नये, उशीर होऊ नये. यासाठी हे डिलिव्हरी बॉय प्रचंड मेहनत घेत असतात.

यादरम्यानच देशात हिट अँड रन प्रकरणी आलेल्या नव्या कायद्याविरोधात ट्रक चालकांनी संप केला होता. त्यामुळे पेट्रोलचा पुरवठा बंद झाल्याने गाडीमध्ये इंधन नसल्याने एका झोमॅटो बॉयने चक्क घोड्यावरून प्रवास करत ग्राहकापर्यंत त्याची डिलिव्हरी पोहोचवली आहे. या झोमॅटोच्या डिलिव्हरी बॉय चा घोड्यावरून प्रवास करतानाचा हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल झालाय.

Pune News : पुण्यात दरोडा! 5 किलो सोनं, 10 लाख रुपयांवर चोरट्यांचा डल्ला; गुन्हा दाखल

यामध्ये तो घोड्यावरून जात असून त्याच्या पाठीवरती झोमॅटोच्या पार्सल ची बॅग आहे. ही घटना हैदराबादमधील चंचलगुंडा परिसरामध्ये घडली. या घटनेमुळे वेळ डिलिव्हरी देण्याचं या डिलिव्हरी बॉईजवर असणार असणारी जबाबदारी, अधोरेखित झाली आहे.

दिवसेंदिवस किंग खानच्या ‘डंकी’ची बिकट परिस्थिती, 13व्या दिवशी निम्म्याहून कमी कमाई

दरम्यान हिट अँड रन प्रकरणांच्या (Hit and Run Law) नव्या कायद्याबाबत सरकार आणि वाहतूकदार यांच्यात समझोता झाला आहे. परिवहन संघटनेने देशभरातील चालकांना संप (Truck Drivers Protest) मागे घेण्यास सांगितले आहे. सध्या कायद्याची अंमलबजावणी होणार नसून ज्यावेळी त्याची अंमलबजावणी होईल, त्या वेळी संघटनेशी चर्चा केली जाईल, असे आश्वासन संघटनेला सरकारकडून देण्यात आले आहे. यानंतर ऑल इंडिया मोटर ट्रान्सपोर्ट काँग्रेसने चालकांना संप मागे घेण्याचे आवाहन केले आहे.

follow us