मोठी बातमी ! नक्षलवाद्यांच्या हल्ल्यात सीआरपीएफचे दोन जवान शहीद

सुकमा जिल्ह्यात सिलगरहून आणि टेकुलागुडेम या दोन गावांच्यामध्ये नक्षलवाद्यांनी स्फोटके (आयईडी) पेरून ठेवली होती.

मोठी बातमी ! नक्षलवाद्यांच्या हल्ल्यात सीआरपीएफचे दोन जवान शहीद

Naxalist Crpf

Two CRPF personnel were killed in an Improvised Explosive Device (IED) blast by Naxals: छत्तीसगडमधील नक्षलवाद्यांविरोधात जोरदार मोहीम सुरू आहे. गेल्या महिन्यात सुरक्षा दलाने अनेक नक्षलवाद्यांचा खात्मा केला आहे. पण एका स्फोटात सीआरपीएफचे दोन जवान शहीद झाले आहेत. सुकमा जिल्ह्यात रविवारी दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली होती.

मनोज जरांगे म्हणजे मराठा समाज नाही, राधाकृष्ण विखेंचं जरांगेंवर टीकास्त्र

सुकमा जिल्ह्यात सिलगरहून आणि टेकुलागुडेम या दोन गावांच्यामध्ये नक्षलवाद्यांनी स्फोटके (आयईडी) पेरून ठेवली होती. रविवारी सीआरपीएफच्या कोब्रा 201 बटालियनचे जवान ट्रक आणि बाईकवरून सिलगरकडून तेकुलागुडेम कॅम्पकडे जात होते. या भागात ते नियमित गस्तीवर होते. त्याचवेळी स्फोटकावरून ट्रक केल्याने स्फोट झाला. त्यात दोन जवान शहिद झाले आहेत. तर काही जण जखमी झाल्याचे वृत्त आहे. कॉन्स्टेबल शैलैंद्र (वय 29) आणि विष्णू आर (वय 35) असे शहीद झालेल्यांची नावे आहेत.

पुण्यात चाललंय तरी काय? तरुणांचा ड्रग्ज घेतानाच व्हिडिओ व्हायरल…

Exit mobile version